Photo: औरंगाबादच्या विमानतळ रोडवरील हरितपट्टयातील अतिक्रमण काढले
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
11 Feb 2023 08:40 PM (IST)
1
गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद महानगरपालिकेकडून अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
जी-20 च्या पार्श्वभूमीवर शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात आले आहे.
3
दरम्यान आज महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने पुन्हा एकदा कारवाई केली.
4
प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांच्या आदेशानुसार अतिक्रमण विभागाने ही कारवाई केली आहे.
5
शहरातील मुकुंदवाडी ते चिकलठाणा विमानतळ या मार्गावरील हरितपट्टयातील अतिक्रमण काढण्यात आले.
6
यावेळी एकूण 30 अनधिकृत टपऱ्यांचे अतिक्रमण हटविण्यात आले आहे.
7
यावेळी अतिक्रमण हटाव विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या पथकाने कारवाई केली आहे.
8
जेसीबीच्या मदतीने अतिक्रमण काढण्यात आले आहे.
9
तसेच रस्त्यावरील छोट्या-मोठ्या टपऱ्या पथकाने काढून घेतल्या.