Aurangabad: रावसाहेब दानवेंच्या कन्या राजकीय रिंगणात, सुरवात भव्य मोर्च्याने
आपल्या विविध मागण्यासाठी संजना जाधव यांनी कन्नड शहरातील पिशोर नाका ते तहसील कार्यालयपर्यंत भव्य असा मोर्चा काढला होता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकन्नड-सोयगाव तालुक्यातील शेतकरी, महिला बचत गट, संजय गांधी स्वावलंबन आणि श्रावणबाळ योजनेतील प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संजना जाधव यांच्या नेतृत्वाखाली निघाला मोर्चा
जाधव यांची काढलेल्या मोर्च्यात मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळाली.
यावेळी संजना यांनी जोरदार भाषण करत प्रशासनावर निशाणा साधला.
यावेळी महिलांची देखील मोठ्या प्रमाणावर संख्या पाहायला मिळाली.
दरम्यान यावेळी प्रशासनाकडे वेगवेगळ्या मागण्याबाबत निवेदन देण्यात आले.
शेतकऱ्यांचे अतीवृष्टी अनुदानाचे पैसे त्वरीत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची मागणी करण्यात आली.
शेतकऱ्यांचे विजबील सरसकट माफ करण्याची मागणी.
कन्नड तालुक्यातील उर्वरित गावांचा पोखरा योजनेत समावेश करण्यात यावा.
पी. एम. किसान सन्मान निधीतील वंचीत शेतकऱ्यांचा समावेश करुन, त्यांना पी.एम. सन्मान निधीचा लाभ त्वरीत मिळावा.
कन्नड तालुक्यात 2021-22 मध्ये झालेल्या आतीवृष्टीमुळे 15 कोल्हापुरी बंधारे वाहुन गेल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले तरी त्यांची दुरुस्ती तात्काळ करण्यात यावी.
कन्नड सोयगांव तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते हे अतिशय दयनीय अवस्थेत आहे. तरी त्यांची सुधारणा तात्काळ करण्यात यावी.
महिला बचत गटांना व्यवसायाकरिता बिनव्याजी कर्जपुरवठा करण्यात यावा.
कापुस, ऊस, मका, सोयाबिन या पिकांना योग्य भाव मिळालाच पाहिजेत, अशीही मागणी करण्यात आली.