PHOTO: पंकजा मुंडे यांनी ताफा थांबवून स्वतः बनवला PM चहा
डॉ. कृष्णा केंडे
Updated at:
19 Oct 2022 11:45 AM (IST)
1
चहाची तलप लागल्याने पंकजा यांनी भर रस्त्यात ताफा थांबवून स्वतः एका हॉटेलमध्ये चहा बनवला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
औरंगाबाद-बीड प्रवास करत असतानाच पंकजा मुंडे यांना चहाची तलप लागली.
3
मग काय पंकजा यांनी बीड रोडवरील निपाणी फाट्याजवळ असलेल्या एका हॉटेलवर आपला ताफा थांबवला.
4
पंकजा यांना चहा प्यायचा असल्याने त्यांच्या सहकाऱ्यांनी हॉटेल चालक दिनेश शिंदे यांना चहाची ऑर्डर दिली.
5
पण त्याचवेळी पंकजा मुंडे यांनी आपण स्वतः चहा बनवणार असल्याचे सांगत, थेट हॉटेलमधील किचन गाठलं.
6
दिनेश यांच्याकडून दुध,चहा पती मागवून पंकजा मुंडे यांनी स्वतः चहा बनवलं.
7
त्यानंतर त्यांनी सर्व सहकाऱ्यांसोबत चहाचा आनंद घेतला.
8
विशेष म्हणजे या चहाला त्यांनी PM चहा म्हणजेच पंकजा मुंडेंचा चहा असे नाव देखील दिले.