PHOTO: सावेंच्या घरावर धडकले शिवभक्त, राज्यपाल 'हटाव'ची मागणी
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यपालांच्या विधानावरून राजकीय नेत्यांच्या घरासमोर आठवडाभर ढोल बजाव आंदोलन केले जाणार असल्याची घोषणा मराठा क्रांती मोर्च्याकडून शनिवारी करण्यात आली आहे.
या आंदोलनाची सुरुवात सहकार मंत्री अतुल सावे यांच्या घरासमोर ढोल वाजवून करण्यात आली आहे.
सावे यांच्या औरंगाबाद शहरातील शहानुर मिया दर्गा येथील घरासमोर हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी राज्यपालांच्या वक्तव्यावरून अतुल सावेंना जाब विचारण्यात आला.
तर शिवभक्तांच्या भावना सरकारपर्यंत पोहचवणार असल्याचं सावे यांनी यावेळी सांगितले.
तर यापुढे आठवडाभर दररोज विविध पक्षांच्या पुढार्यांच्या घरासमोर जाऊन ढोल वाजवून आंदोलन करणार असल्याचं मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील म्हणाले.