Photo: औरंगाबादेत महावितरण कार्यालयात नागरिकांचे मेणबत्या पेटवून आंदोलन
परिसरातील सतत वीज जात असल्याने नागरिकांनी अनोखं आंदोलन केले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसंतप्त रहिवाशांनी रात्री 10 वाजता महावितरण कार्यालयात जाऊन मेणबत्त्या पेटवत आंदोलन केले.
सातारा भागातील गोलवाडी येथील कार्यालय गाठून मेणबत्त्या पेटवण्यात आल्या.
टोल फ्री क्रमांवर तब्बल 25 तक्रारी करून सुद्धा महावितरण दुलर्क्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
त्यामुळे सुधाकरनगर परिसरातील साऊथ रिपब्लिक सोसायटीत राहणाऱ्या रहिवाशांनी अनोखे आंदोलन केले.
संतप्त 15 ते 20 रहिवाशांनी मेणबत्त्या पेटवत सरळ महावितरणच्या कार्यालयात धडक मारली.
नागरिकांचा संताप पाहून महावितरणचे अधिकारी कर्मचारी खडबडून जागे झाले आणि रात्री 12 वाजता पाहणी केली.
दुसऱ्या दिवशी या परिसरातील विद्युत पुरवठा तात्पुररत्या स्वरूपात सुरळीत केला.
मात्र हा त्रास कायमस्वरूपी दूर करावा, अशी मागणी या परिसरातील रहिवाशांनी केली आहे.