Photo: मोसंबीला गळती लागल्याने बळिराजा संकटात
मोसीन शेख
Updated at:
26 Jul 2022 11:27 AM (IST)
1
सततच्या पावसाचा फटका आता मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांनाही बसत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
अधिकच्या पावसामुळे जिवापाड जोपासलेल्या मोसंबीच्या बागांना फळगळती लागलीय.
3
बागा आता आंबा व मृग बहाराने लगडल्या असून फळ परिपक्व होण्याच्या उंबरठ्यावर आहे.
4
मात्र, महिन्याभरापासून फळांना मोठ्या प्रमाणात गळती सुरु झाल्याने मोसंबी उत्पादक संकटात सापडला आहे.
5
आंबा बहाराची फळे उतरविण्यासाठी महिनाभराचा तर मृग बहाराची फळे उतरविण्यासाठी पाच महिन्याचा कालावधी आहे.
6
व्यापारी वर्ग बागांतील फळगळती पाहून उक्ते सौदे टाळत असून टनाप्रमाणे बोली करीत आहे.
7
तर शेतकरी फळगळतीची धास्ती घेऊन बागा तोट्याने विक्री करीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
8
अशीच काही परिस्थिती औरंगाबाद पैठण तालुक्यातील पाचोड भागात पाहायला मिळत आहे.