Photo: संत एकनाथ, संत ज्ञानेश्वर माऊलींचं मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन...
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी पैठण येथील श्रीक्षेत्र एकनाथ महाराज मंदिरास भेट देऊन श्री संत एकनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदर्शनानंतर विश्वस्त मंडळाच्यावतीने शाल,श्रीफळ, एकनाथ महाराजांची मूर्ती आणि ग्रंथ देऊन मुख्यमंत्री शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी नाथ वंशज हरी पंडित गोसावी, मिलिंद बुवा गोसावी, रघुनाथ बुवा गोसावी पालखीवाले आदी उपस्थित होते.
याचवेळी श्री संत ज्ञानेश्वर माऊली यांची जन्मभूमी असलेल्या श्रीक्षेत्र आपेगाव येथील माऊलींच्या मंदिरात जाऊन मुख्यमंत्र्यांनी दर्शन घेतले.
श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या जन्मभूमीच्या दर्शनाने आपण भारावलो असून सर्वसामान्यांची सेवा करण्याची शक्ती माऊली निश्चितपणे देतील, अशी भावनाही मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली.
दर्शनानंतर विश्वस्त मंडळातर्फे मुख्यमंत्र्यांचा शाल, श्रीफळ, श्री संत ज्ञानेश्वर माऊलींची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला.