PHOTO: 'कंडोम इंडस्ट्री' औरंगाबादची नवीन ओळख, महिन्याकाठी 100 मिलियन कंडोमची विक्री
कारण औरंगाबादच्या इंडस्ट्रीतून तब्बल 36 देशांना कंडोम पुरवला जात आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविशेष म्हणजे भारतात कंडोम निर्मितीच्या दहा कंपन्या असून, त्यापैकी सहा कंपन्या एकट्या औरंगाबादेत आहेत.
औरंगाबादच्या 'कंडोम इंडस्ट्री'ला कंडोम तयार करण्यासाठी लागणारा रबर केरळ आणि तामिळनाडू राज्यातून आणला जातो.
लॅटेस्ट नावाच्या झाडापासून हे रबर तयार केले जाते.
औरंगाबादमध्ये कंडोमची उत्पादन क्षमता ही महिन्याकाठी 100 मिलियन पिसेसची आहे.
तयार झालेल्या कंडोमचा प्रामुख्याने युरोप, आफ्रिका, लॅटिन अमेरिका आणि काही आशियाई देशामध्ये पुरवठा केला जातो.
यातून वर्षाकाठी 200 ते 300 कोटींची उलाढाल होत असते.
तर औरंगाबादमध्ये असलेल्या 'कंडोम इंडस्ट्री'मुळे जवळपास दोन हजार लोकांना रोजगार मिळाला आहे. कामसूत्र, नाईट रायडर्स पासून ते अनेक ब्रँडचे कंडोम औरंगाबादमध्ये तयार होतात.
शिवाय याठिकाणी 40 ते 50 फ्लेवरचे कंडोम तयार होतात.
औरंगाबादेतील रेमंड ग्रुपचा कामसूत्र कंडोम चीनला निर्यात केला जातो.
रेमंड ग्रुप दरवर्षी चीनला अंदाजे 36 करोड कंडोम निर्यात करत असल्याची माहिती कंपनीचे मॅनेजर बाबू आयर यांनी दिली आहे.
त्यामुळे औरंगाबादला आता 'कंडोम इंडस्ट्री'चा माहेरघर अशी ओळख मिळत आहे.