PHOTO: G-20 परिषद निमित्ताने औरंगाबाद होतंय चकचकीत
दरम्यान औरंगाबाद महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजीत चौधरी यांनी या कामांची पाहणी केली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया पाहणी दौरानिमित्त आयुक्तांनी रंगीन गेट येथील गट्टू बसविण्याचे काम आणि रंगीन गेट ते अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळापर्यंत रस्ता दुभाजकाचे डागडुजी व दुरुस्तीचे कामांची पाहणी केली.
आयुक्त निवास जलश्री बंगल्याची बाहेरची भिंत आणि त्याचा समोर नेहरू बाल उद्यानच्या भिंतीवर करण्यात आलेली पेंटिंगची पाहणी त्यांनी यावेळी केली.
दिल्ली गेटची पाहणी करताना समोरील हिमायत बागची तुटलेली संरक्षण भिंत दुरुस्त करण्याचे निर्देश देण्यात आले.
विवांता ताज समोरील फुटपाथ सुशोभीकरणचे कामाची पाहणी केली.
हर्सूल टी पॉइंट येथे न्हाईमार्फत चौकाचे सुशोभीकरणाचे कामाची पाहणी यावेळी केली.
याशिवाय जाधववाडी सिग्नल पर्यंत सर्विस रोडचे कामांचा आढावा आयुक्तांनी घेतला.
पाहणी दौऱ्याची सांगता दिल्लीगेट मार्गे हर्सूल टी पॉइंट ते जाधव वाडी सिग्नल येथे करण्यात आली.