PHOTO: औरंगाबादच्या चंपा चौकातील तब्बल 80 अतिक्रमण जमीनदोस्त
दरम्यान आज देखील महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने जोरदार कारवाई केली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशहरातील चंपा चौक ते जीन्सी रेगटीपुरा चौक डीपी रस्त्यावरील अतिक्रमणे जमीनदोस्त केली आहे.
धक्कादायक म्हणजे या रस्त्यांवर काही राजकीय पक्षांनी अतिक्रमण करत चक्क राजकीय कार्यालय थाटली होती.
या अतिक्रमणामध्ये नागरिकांनी रस्त्यावर कच्चे पक्के बांधकाम करून अतिक्रमणे केली होती.
या 80 फूट डीपी रस्त्यावर आज एकूण 80 अतिक्रमणे निष्काशीत करण्यात आली.
या अतिक्रमणामध्ये 15 बाय 15 ते दहा बाय पंधरा याचे सिमेंट विटा मातीमध्ये बांधकाम करून दुकाने थाटली होती.
अतिक्रमणधारकांना पंधरा दिवसांपूर्वीच नियमानुसार सूचना देऊन, मार्किंग करण्यात आली होती.
त्यानुसार मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्या आदेशानुसार अखेर कारवाई करत एकूण 80 अतिक्रमण काढण्यात आले आहेत.