PHOTO: निवडणूकीत पराभव, विरोधकांनी उद्धवस्त केली शेतकऱ्याची पपईची बाग
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Dec 2022 02:40 PM (IST)

1
करोडी परिसरातील रामभाऊ धोंडिबा दवंडे यांनी एका एकर जमिनीमध्ये 700 झाडांची पपईची बाग लावली होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
मात्र अज्ञाताने रात्रीच्या सुमारास परिपक्व झालेली जवळजवळ साडेतीनशे पपईची झाडे तोडून टाकली.

3
गुरुवारी सकाळी रामभाऊ शेतात गेल्यावर हा सर्व प्रकार उघडकीस आला.
4
यात रामभाऊ दवंडे यांचे जवळपास दोन ते तीन लाखांचे नुकसान झाले.
5
करोडी ग्रामपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत त्यांची सून सोनाली दवंडे या वॉर्ड क्रमांक 1 मधून निवडणुकीत उतरल्या होत्या.
6
तर निवडणुकीत त्यांचा विजय झाला आणि निकालानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांच्या शेतातील पपईची बाग तोडून फेकण्यात आली आहे.
7
याप्रकरणी दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.