Photo: तब्बल 18 हजार विद्यार्थ्यांसह पालकांकडून सामूहिक राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रम
'आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने जिल्हा प्रशासनाने अनोखा कार्यक्रम राबविला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App18 हजार विद्यार्थ्यांच्या सामूहीक उपस्थितीत स्वराज्य महोत्सव अंतर्गत सामूहिक राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रम विभागीय क्रीडा संकूल येथे पार पडला.
जिल्ह्यातील 77 शाळा आणि महाविद्यालयातून सुमारे 18 हजार विद्यार्थी आणि 4 हजार पालक सर्व विभागप्रमूख अधिकारी, कर्मचारी या कार्यक्रमास उपस्थित होते.
कार्यक्रमा दरम्यान विद्यार्थ्यांनी राष्ट्रभक्तीपर विविध गीतावर नृत्य व गायन सादर केले.
यावेळी खासदार इम्तीयाज जलील, आमदार हरिभाऊ बागडे, ब्रिगेडियर सुनील नारायण, महानगरपालिका आयुक्त अभिजीत चौधरी, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे, पोलीस अधीक्षक मनीष कलावानीया उपस्थित होते.
या अनोख्या सोहळ्याचे दृश्य ड्रोनच्या माध्यमातून टिपण्यात आले आहे.