Photo: शेतकऱ्यांपुढे नवीन संकट, कपाशींवर माव्याचा प्रादुर्भाव
आधीच अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर आता कपाशी पिकांवर मावा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने नवीन संकट उभं राहिलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appऐन पिकांच्या वाढीच्या काळात आणि कपाशी पिके फुलावर असतांना माव्याच्या प्रादुर्भावाने हिरवीगार असलेली कपाशी पिकांचा रंगच बदलला आहे.
कपाशींवर माव्याचा प्रादुर्भाव पाहायला मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
औरंगाबादच्या एकट्या सोयगाव तालुक्यात यंदा तब्बल 35 हजार 325 हेक्टरवर कपाशी पिकांची लागवड करण्यात आलेली आहे.
त्यापैकी 30 हजार 115 हेक्टरवरील कपाशी पिकांना माव्याचा प्रादुर्भाव झाल्याचे कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आले आहे.
महागडी कीटकनाशक फवारणी करूनही मावा नियंत्रणात येत नसल्याने, बळीराजाची चिंता वाढली आहे.
त्यामुळे यंदा कपाशीच्या उत्पन्नात घट होणार असल्याची शक्यता आहे.