PHOTO: औरंगाबाद महानगरपालिकेकडून 382 किलो प्लास्टिक जप्त, व्यापाऱ्यांमध्ये खळबळ
शहरात प्रतिबंधित प्लास्टिकची विक्री आणि वापर वारणाऱ्यांविरोधात महापालिकेने पुन्हा एकदा कारवाईची मोहीम तीव्र केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदोन दिवसांत पुंडलिकनगर, अंगुरीबाग, जुना मोंढा, दर्गा चौक आदी भागांत कारवाई करण्यात आली आहे.
दोन दीवसात महापालिकेच्या पथकाने तब्बल 382 किलो प्लास्टिक जप्त केले.
कारवाई करण्यात आलेल्या संबंधित विक्रेत्यांकडून सुमारे 32 हजार रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला.
महानगरपालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त पथकाकडून ही कारवाई केली जात आहे.
सोमवारी झोन क्रमांक 7 आणि झोन क्रमांक 2 मध्ये पुंडलिकनगर रोड व दर्गा चौक या ठिकाण केली कारवाई
मंगळवारी पुन्हा शहरातील झोन क्रमांक दोनमध्ये जुना मोंढा व अंगुरीबाग येथे अंदाजे 361 किलो प्रतिबंधित प्लॅस्टिक जप्त करण्यात आले.
यावेळी 23 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
दिवाळीच्या तोंडावर महानगरपालिकेच्या या कारवाईनंतर व्यापाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.