PHOTO : औरंगाबादमध्ये बसवली 'कोरोना भगाव मशीन', पालिकेने खर्च केले लाखो रुपये
औरंगाबाद पालिकेने तब्बल 20 लाख खर्च करत 'कोरोना भगाव यंत्र' अशी एक नवी मशीन बसवली आहे. या मशीनचं नाव आयन डोम, असं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपालिकेत आयुक्त यांच्या कार्यालयापासून प्रत्येक अधिकारी आणि आरोग्य केंद्रात ही मशीन बसवण्यात आली आहे.
पालिकेने एक मशीन 6 हजार 499 रुपयांना खरेदी केली आहे. अशा 300 मशीन पालिकेने खरेदी केल्या आहेत, त्यामुळे या मशीन बसवण्यासाठी पालिकेने जवळपास 20 लाख रुपये खर्च केले आहेत.
एकीकडे कोरोनाचा संसर्ग कमी होत असताना आता औरंगाबाद पालिकेने हे यंत्र आणल्याने नव्या चर्चेला उधाण आलं आहे.
या इतक्या मोठ्या खरेदीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. तसंच या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही यावेळी केली जात आहे.
याशिवाय कर्मचाऱ्यांना या मशीनचा फायदा होणार का? हे देखील पाहावं लागेल.