Aurangabad News: पैठणचा गोदाकाठ 11 हजार दिव्यांनी उजळला; गोदावरी प्रकट दिनानिमित्त दीपोत्सव साजरा
![Aurangabad News: पैठणचा गोदाकाठ 11 हजार दिव्यांनी उजळला; गोदावरी प्रकट दिनानिमित्त दीपोत्सव साजरा Aurangabad News: पैठणचा गोदाकाठ 11 हजार दिव्यांनी उजळला; गोदावरी प्रकट दिनानिमित्त दीपोत्सव साजरा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/01/11fca7c5309a81e7207b84dd014c93099d404.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=800)
गोदावरी प्रकट दिनाच्या मुहूर्तावर आज पैठणचा गोदाकाठ दिव्यांनी उजळला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App![Aurangabad News: पैठणचा गोदाकाठ 11 हजार दिव्यांनी उजळला; गोदावरी प्रकट दिनानिमित्त दीपोत्सव साजरा Aurangabad News: पैठणचा गोदाकाठ 11 हजार दिव्यांनी उजळला; गोदावरी प्रकट दिनानिमित्त दीपोत्सव साजरा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/01/7f72a60abdf6d5727b952dc967b7dece79ef5.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=800)
संत एकनाथ महाराज समाधी मंदिराच्या पाठीमागील गोदावरीच्या नाथ घाटावर 11 हजार दिवे प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा करण्यात आला.
![Aurangabad News: पैठणचा गोदाकाठ 11 हजार दिव्यांनी उजळला; गोदावरी प्रकट दिनानिमित्त दीपोत्सव साजरा Aurangabad News: पैठणचा गोदाकाठ 11 हजार दिव्यांनी उजळला; गोदावरी प्रकट दिनानिमित्त दीपोत्सव साजरा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/01/f211827e1c7dec794fdded904d39e543f31bb.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=800)
हा नयनरम्य सोहळा आपल्या डोळ्यात साठविण्यासाठी भाविकांनी नाथमंदिर परिसरात गर्दी केली होती.
याप्रसंगी हरी भक्त परायण ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर, पोलिस निरिक्षक किशोर पवार यांच्या हस्ते गोदावरीची पूजा करण्यात आली.
आपल्या संस्कृतीत नदीला माता, आई मानतो. त्यामुळे नदीला आपण माँ गंगा,गोदमाई, माता गोदावरी संबोधतो.
नदी संवर्धनाचा संदेश देत गोदावरी नदी जन्मोसव साजरा करण्यात आला आहे.
नदी संवर्धन आणि संरक्षणाचा संदेश देत गोदावरी नदी अवतरण दिनानिमित्त गोदा आरती करण्यात आली आहे.
यावेळी गोदावरी नदी पात्राशेजारी दिवे आणि पणत्या पेटवून, हजारो नागरिकांच्या उपस्थितीत गोदावरी नदी अवतरण सोहळा, महाआरती करून संपन्न झालाय.
विकासार्थ विद्यार्थी आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
गोदावरी नदी संवर्धन आणि संरक्षणासाठी गोदावरी अवतरण दिन साजरा करण्यात आला.