राहुल सोलापूरकरांचे आणखी एक वादग्रस्त वक्तव्य; जितेंद्र आव्हाडांकडून व्हिडिओ समोर येताच पुण्यातील घराबाहेर तगडा पोलीस बंदोबस्त

छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या अभिनेते राहुल सोलापूरकर (Rahul Solapurkar) यांच्या अडचणीत आता आणखी वाढ होण्याची शक्यता बाळवली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राहुल सोलापूरकर यांचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधातील वक्तव्य केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जाहीर केला आहे.

राहुल सोलापूरकर यांच्या या वादग्रस्त विधानामुळे राज्यात पुन्हा संतापाची लाट उसळण्याची शक्यता आहे.
परिणामी, राहुल सोलापूरकरांच्या पुण्यातील निवासस्थानाबाहेर पोलीस बंदोबस्त कायम ठेवण्यात आला आहे.
खबरदारी म्हणून सोलापूरकर यांच्या कोथरूड येथील निवासस्थानाबाहेर पोलिसांनी तीन दिवसांपूर्वी लावलेला पोलीस बंदोबस्त आजही कायम असल्याचे पाहायला मिळतोय.
या वादग्रस्त विधानामुळे राज्यात पुन्हा संतापाची लाट उसळण्याची शक्यता आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. कोणी नाही मारलं तरी मी तुला झोडणार, मी तुला मारणार. अशी आक्रमक भूमिका आमदार जितेंद्र आव्हाड यांनी घेतलीय.
दरम्यान, खबरदारी म्हणून सोलापूरकर यांच्या कोथरूड येथील निवासस्थानाबाहेर पोलिसांनी पोलीस बंदोबस्त आजही कायम ठेवला आहे.