Amravati News: भर उन्हाळ्यातही विदर्भात भरभरुन वाहणारी पूर्णा नदी..
विदर्भात सध्या उन्हाचा पारा 45 पार गेलाय पण या दुष्काळात जर एखादी नदी खळखळून वाहतेय हे म्हटलं तर तुम्हाला विश्वास बसणार नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविदर्भात मोठ-मोठ्या नदीवर कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आले पण विदर्भात हे बंधाऱ्याचे वाटोळे झाले हे सर्वश्रुत आहे.
पण अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यातील पूर्णा नदीवर अत्यंत कमी खर्चात म्हणजे 2 कोटी रुपये खर्च करून राज्यातील पहिला विदर्भ बंधारा आमदार बच्चू कडू यांच्या संकल्पेतून 2021 मध्ये बांधण्यात आला.
या नवीन पद्धतीने बांधलेल्या विदर्भ बंधाऱ्याचा परिणाम आता दिसायला लागलाय. या बंधाऱ्यामुळे तब्बल तीन ते चार किलोमीटर पर्यंत पाणी थांबलेले आहे.
जानेवारी महिन्यात आटून जाणारी ही पूर्णा नदी यावर्षी भर उन्हाळ्यात भरभरून वाहत आहे.
नदीलगतच्या परिसरातील भूजल पातळी वाढल्याने शेतकऱ्यांना ओलिताकरिता याचा फायदा होत असून चार-पाच गावातील शेतकरी आपल्या शेतात बारा ही महिने पिक घेतात
विदर्भात जमीन ही कच्ची असल्याने फाउंडेशन करतांना खूप खोल करावे लागते. परंतु विदर्भ बंधारामध्ये जमिनी वरचे बांधकाम हे सरळ भींत घेऊन करतात त्यामुळे पिलर आणि स्लॅबचा खर्च कमी होतो.
कोल्हापूरी बंधाऱ्यात गेटची संख्या खूप असते पण या नवीन विदर्भ बंधाऱ्यामध्ये गाळ साचणार नाही एवढेच गेट बनविले जाते..
करोडो रुपये खर्च करून मोठे बंधारे होत नसेल तर अशा पद्धतीने कमी खर्चात विदर्भ बंधारे तयार केले तर शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होईल आणि पाणी पातळी देखील वाढेल.
असे विदर्भ बंधारे व्हावे म्हणून नियामक मंडळाकडून मंजुरात मिळाली तर अशा पद्धतीचे बंधारे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात व्हावे अशी माहिती आमदार बच्चू कडू यांनी एबीपी माझाशी बोलतांना दिली