Amravati News : संत्रा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात; संतप्त बळीराजानं रस्त्यावर संत्रे फेकून केला चक्काजाम
अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यात मोठ्या प्रमाणात संत्र्याचे उत्पादन केल्या जाते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजिल्ह्यातील जवळ जवळ 35 % संत्रा बागातील संत्री अजुनही विक्री झालेल्या नाही. त्यामुळे संत्रा गळतीच्या मार्गावर आहे.
परिणामी जानेवारी महिना लागुनही बहुतांश संत्री अद्याप शेतामध्येच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे.
बांगलादेशला जाणाऱ्या संत्रावर 88 % निर्यात कर प्रति किलो लावल्याने संत्राची मागनी कमी झाली.
आज वरुड तालुक्यात अस्तित्वात असलेल्या करोडो रूपयाच्या संत्रा मालाचे आर्थिक नुकसान शेतकऱ्यांना भोगावे लागत आहे.
संत्रा उत्पादकांना हेक्टरी 1 लाख रूपये अनुदान मिळावे याकरिता विक्रम ठाकरे यांच्या नेतृत्वात कापूस आणि संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने भव्य चक्काजाम आंदोलन वरुड तहसिल कार्यालयासमोर करण्यात आले.
यावेळी शेतकऱ्यांनी रस्त्यावर टायर जाळून चक्काजाम केला तर मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर संत्रे फेकून शासनाचा निषेध केला.
यावेळी सगळ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
वरूड तालुक्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती मागील काही वर्षांपासुन वातावरणाच्या बदला मुळे डबघाईस आलेली आहे. शेतीतुन उत्पन्न झालेल्या मालाला उचित भाव शासनातर्फे न मिळाल्यामुळे प्रचंड नुकसान शेतकरी बांधवांच होत आहे.
शेती उत्पादनाच्या अनियमित किमतीमुळे शेतकरी पुरता हैरान झालेला आहे. कधी 12 हजार हजार तर कधी 1 हजार कापसाला भाव तर आज अचानक 6 हजार 500 रूपये भावाने कापूस विकला जात असल्याने शेती मशागत आणि उत्पन्न घ्यायला लावलेला खर्च ही निघत नसल्यामुळे आत पुढ काय? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे.