Akola: अकोल्यात चंद्रशेखर बावनकुळेंना दाखवले काळे झेंडे; जालन्यातील घटनेविरोधात मराठा समाज आक्रमक
सकल मराठा समाजाच्या वतीने अकोल्यात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्यात आले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना अकोला जिल्ह्यातील पारस येथे काळे झेंडे दाखवण्यात आले.
जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचाराविरोधात मराठा कार्यकर्त्यांनी हे काळे झेंडे दाखवले.
यावेळी आंदोलकांनी बावनकुळेंचा ताफा अडवण्याचा प्रयत्न देखील केला.
पोलिसांनी आंदोलक गोपाल पोहरेसह तीन-चार आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे.
आज अकोल्यात पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी बावनकुळे अकोल्यात आले आहेत, या दरम्यान मराठा समाजाचा रोष पाहण्यास मिळत आहे.
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरावली या गावात शांततेच्या मार्गाने मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या मराठा बांधवांवर पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला. यात अनेक मराठा तरुण आणि महिला जखमी झाल्या. या घटनेचा राज्यभरातील मराठा समाजाकडून निषेध नोंदवण्यात येतोय.
अकोला ते खामगाव या नॅशनल मार्गावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे संवाद यात्रेसाठी अकोला येथे येत असताना शेळद फाटा येथे त्यांना काळे झेंडे दाखवत निषेध आंदोलन करण्यात आलं आहे.
अकोला ते खामगाव या नॅशनल मार्गावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे संवाद यात्रेसाठी अकोला येथे येत असताना शेळद फाटा येथे त्यांना काळे झेंडे दाखवत निषेध आंदोलन करण्यात आलं आहे.
तसेच यावेळी एक मराठा लाख मराठाच्या घोषणादेखील देण्यात आल्या.
मराठा समाजाच्या वतीने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
मराठा समाजाकडून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे.
जालन्यातील प्रकारानंतर एकूणच मराठा समाज संतप्त झाला आहे.