Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Photo : अकोल्याच्या दुर्घटनास्थळी कृषीमंत्री अब्दुल सत्तारांची भेट, पाहा फोटो
पारस गावातील बाबूजी महाराज मंदिरात रविवारी (9 एप्रिल) रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदरम्यान घटनेची माहिती मिळताच अब्दुल सत्तार घटनास्थळी पोहचले. तसेच जखमींची भेट घेऊन त्यांना धीर दिला.
तसेच त्यांनी पारस येथील घटनास्थळी देखील भेट देऊन पाहणी केली आहे. तसेच अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
पारस येथील घडलेली दुर्घटना अत्यंत दुःखदायक आणि दुर्दैवी आहे. या घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दखल घेतली असून जखमींवर तातडीने उपचार करण्यासाठी आदेश देण्यात आले असल्याचे मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.
यावेळी जखमी रुग्णांची त्यांनी भेट घेऊन त्यांच्या तब्येतेची विचारपूस केली, तसेच सर्व उपचार केले जाईल असे आश्वासन दिले.
घटनेतील मृतांच्या वारसांना मदत देण्याबाबत मुख्यमंत्री लवकरच घोषणा करतील असे अब्दुल सत्तार म्हणाले.