Akola News : अकोला जिल्ह्यातील येंडली गावावं अनुभवलं वच्छला आजीच्या 'रेस्क्यू'चा थरार, पाहा फोटो
'काळ आला होता, पण वेळ आली नव्हती', असं म्हटलं जातं. याचाच प्रत्यय आलाय अकोला जिल्ह्यातील आपोती गावातील वत्सलाबाई राणे या आजीला...
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App21 जुलैला या आजी अमरावती जिल्ह्यातील ऋणमोचन येथे देवदर्शनासाठी गेल्या होत्या. यावेळी त्या मंदिराशेजारी असलेल्या पुर्णा नदीत पाय धुण्यासाठी उतरल्या. परंतु, पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने त्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या.
यावेळी एका युवकाने त्यांना वाचविण्याचा प्रयत्नही केलाय. परंतु, त्यात त्याला यश आलं नाहीय. त्या रात्री त्या आजीचा शोध घेण्याचा प्रयत्न गावातील युवकांनी केला, परंतु यश आलं नाही.
काल दुपारी 12 च्या सुमारास मुर्तिजापूर तालुक्यातील येंडली गावानजिकच्या पुर्णा नदीत एका गुराख्याला वाचवा, वाचवा असा आवाज आला. त्याने ती गोष्ट गावात सांगितल्यावर प्रशासनानं सूत्र हलवली. अन् पिंजरच्या संत गाडगेबाबा आपात्कालिन शोध व बचाव पथकानं तिची पुराच्या पाण्यातून सुटका केली
वाहून गेल्यानंतर आजीला झाडाच्या एका फांदीचा आधार मिळाला होता. यानंतर तब्बल पुराच्या पाण्यात तब्बल 18 तास संघर्ष करत तग धरला. शेवटी आजीचा जीव वाचल्याने तिच्या कुटुंबियांसह गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
पुराच्या पाण्यात वच्छलाबाई शेषराव राणे ही 60 वर्षांची आजीबाई वाहून गेली. मात्र सुदैवाने एका झाडाच्या फांदीला धरून आजीने या छोट्या झाडाचा आसरा घेतला.
झाडाला पकडून आजी 18 तासांवर मृत्यूशी झुंज देत होती. पिंजरच्या संत गाडगेबाबा शोध आणि बचाव पथकाच्या मदतीनं या आजीला वाचविण्यात यश आले आहे.