Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Akola News : अन् अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये किन्नरांनी केला 'रॅम्प वॉक', पाहा फोटो
अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये आज एक हटके 'फॅशन शो' पार पडला आहे ( सर्व फोटो सौजन्य : आनंद बाळे, 'बाळे स्टुडिओ', अकोट)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहा 'फॅशन शो' होताय समाजात आपलं अस्तित्व शोधणाऱ्या किन्नरांचा... अकोट जेसीआय या संस्थेनं या 'फॅशन शो'चं आयोजन केलं होतंय.
विदर्भातील अनेक शहरांतून किन्नर यात सहभागी झाले होते. यावेळी किन्नरांनी रॅम्पवर झटकेदार 'कॅटवॉक' केला आहे
या 'फॅशन शो'साठी विदर्भातील अकोला, खामगाव, शोगाव, अमरावती, मुर्तिजापूर, अकोट, मलकापूर, वाशिम, यवतमाळ आदी ठिकाणांवरून किन्नर आले होते
'फॅशन शो'आधी किन्नरांची सामाजिक संदेश असलेले फलक घेत गावातून मिरवणूक काढण्यात आलीय.
सहभागी 'मॉडेल्स' किन्नरांना रोख आणि भेटवस्तूच्या स्वरूपात बक्षिसं देण्यात आलीय.
अकोट जेसीआय ही संस्था गेल्या 15 वर्षांपासून असे हटके 'फॅशन शो' आयोजित करत असते
यामध्ये आतापर्यंत म्हशी, गाढव, सायकल, बैलबंडी, बुलेट, बैल अशा अनेक 'फॅशन शों'चा समावेश आहे.
अकोटातील किन्नरांसाठीचा हा 'फॅशन शो' त्यांना नवी ओळख आणि सन्मान देणारा होता
आजचा हा आगळा-वेगळा फॅशन शो पाहण्यासाठी अकोटकरांनी चांगलीच गर्दी केली ( सर्व फोटो सौजन्य : आनंद बाळे, 'बाळे स्टुडिओ', अकोट)