Akola News : ऐकावं ते नवलंच... 'हटके' फॅशन 'शो'ची चर्चा... बकऱ्यांचा रॅम्प वॉक
बकरी आणि सौंदर्याचा काही संबंध आहे काय?... बकरी कधी 'सौंदर्यवती' बनून रॅम्प वॉक करू शकते का?... या सर्व-सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला हवी असेल तर, अकोला जिल्ह्यातील एका 'फॅशन शो'मध्ये आपल्याला जावं लागेल.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appडौलदार चाल, पायात पैंजण, गळ्यात माळा, डोक्यावर टोपी... नखशिखांत सौंदर्य अन शृंगारानं सजलेली ही मॉडेल...
पण, ही 'मॉडेल'सारखी सजलेली ही सौंदर्यवती बकरी आहे. हे दृष्य अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये पाहायला मिळालं.
अकोटमध्ये आज बिलबिले मंगल कार्यालयाच्या मैदानावर अनेक बकऱ्यांनी 'मॉडेल' म्हणून रॅम्प वॉक केला. अकोटमध्ये जेसीआयकडून 'बकरी फॅशन शो' आयोजित करण्यात आला होता.
सौंदर्य आणि 'फॅशन शो'ची नवी व्याख्या सांगणाऱ्या या फॅशन शोमध्ये तालुक्यातील 60 हून अधिक बकऱ्या स्पर्धक म्हणून सहभागी झाल्या होत्या.
अकोट शहर गेल्या दशकभरात येथे होणाऱ्या प्राण्यांच्या हटके फॅशन शोंमुळे नावारूपाला आलं आहे.
या शोमध्ये फक्त 'ग्लॅमर'च नव्हतं, तर यामध्ये कृषी अर्थव्यवस्थेत बकरीचं महत्व सांगणारे 'स्लोगन्स' स्पर्धेच्या ठिकाणी लावण्यात आले होते.
अकोट जेसीआय या सामाजिक संघटनेनं हे 'हटके' आयोजन केलं होतं. हा आगळा-वेगळा फॅशन शो पाहण्यासाठी अकोटकरांनी चांगलीच गर्दी केली होती.
अलिकडे फॅशन शो नावाखाली आपल्या संस्कृतीचं ओंगळवाणं प्रदर्शन मांडलं जातं.
मात्र, पशुसंवर्धनासोबतच कृषी अर्थव्यवस्था मजबूत करण्याचा संदेश देणाऱ्या विचारांची पेरणी करणारा अकोटमधील बकऱ्यांचा हा फॅशन शो म्हणूनच सर्वार्थाने वेगळा म्हणावा लागेल.