National Yogasana Sports Championship | तिसऱ्या राष्ट्रीय योगासन स्पर्धेत सादर केलेल्या योग प्रात्यक्षिकांनी जिंकली उपस्थितांची मने...
29 देशातील 800 विद्यार्थ्यांनी 65 योग तज्ञांच्या समोर प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांची मने जिंकली आहे .
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपारंपारिक योगा बरोबरच संगीतावर आधारित योग प्रात्यक्षिकांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले..
संगमनेर तालुक्यातील ध्रुव शाळेत सुरू असलेल्या तिसऱ्या राष्ट्रीय योग स्पर्धेत गेल्या दिवसांपासून योगासन सादर केली जात असून
यातून निवडलेल्या विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवर संधी मिळणार आहे.
योगासने या विषयाचा क्रीडा प्रकारात समावेश झाल्यानंतर योगासनांचा प्रचार आणि प्रसार वेगाने सुरू आहे..
आत्तापर्यंत मोठ्या शहरात होणारी राष्ट्रीय स्पर्धा यावर्षी तालुक्याच्या ठिकाणी पार पडतेय..
संगमनेर तालुक्यातील ध्रुव अकॅडमी मध्ये गेल्या तीन दिवसांपासून योगासनांचा हा महाकुंभ सुरू असून
या राष्ट्रीय योगासन स्पर्धेत 29 राज्यातील 800 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे
या स्पर्धेचा परीक्षण करण्यासाठी देशभरातून 65 योग तज्ञ सहभागी झाले आहेत..
पारंपारिक योगाबरोबरच संगीताच्या ठेक्यावर ताल धरत योगासन या स्पर्धेत सादर केली जात आहेत
वैयक्तिक दुहेरी आणि सांघिक अशा तीन प्रकारांमध्ये ही स्पर्धा पार पडत असून या स्पर्धेत संगीताच्या तालावर ठेका धरत सादर केलेल्या योगासनांनी उपस्थितांची मने जिंकली आहेत