Ahmednagar News : सेलिब्रेशन तर हवंच! कावळे कुटुंबियांत तीन पिढ्यांनंतर आनंदी आनंद, मुलीच्या जन्मानंतर काढली रथातून मिरवणूक
कुटुंबात जन्मलेल्या कन्यारत्नाचे वाजत गाजत रथातून मिरवणूक काढून फटाके वाजवीत घरी स्वागत करण्यात आलं. यावेळी परिसरातील नागरिकांनी आणि नातेवाईकांनी फुलांची उधळण करत या चिमुकलीचे स्वागत केलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appघरात लेक जन्माला आली की अनेक लोक नाक तोंड मुरडतात. मुलगा जन्माला आला नाही म्हणून अनेकजण नाराज झाल्याचं आपण पाहिलं आहे. मात्र लेकीच्या जन्माचा मोठा सोहळा साजरा करण्यात आला.
आपल्या समाजात जिथे वंशाला दिवा पाहिजे असे म्हणत घरात मुलगी झाली की नाराज होणारी मंडळी आहेत. त्याच समाजात घरात मुलगी जन्मली म्हणजे लक्ष्मी आली असे म्हणत तिचे जंगी स्वागत करणारी मंडळी देखील आहेत.
सध्याच्या युगात प्रत्येक गोष्टीत मुली-मुलांच्या बरोबरीने उभे आहेत. अनेक जणांना घरात वंशाचा दिवा नसला तरी मुलगी हीच आपला वंशाचा दिवा म्हणत तिला मोठ्या प्रेमाने सांभाळतात.
अहमदनगर शहरातील कावळे कुटुंबामध्ये तब्बल तीन पिढ्यानंतर मुलीचा जन्म झाल्याने त्या गोंडस मुलीचे स्वागत वाजत गाजत केले. यावेळी सनई चौघडे आणि रथातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी परिसरातील नागरिकांनी आणि नातेवाईकांनी फुलांची उधळण करत या चिमुकलीचे स्वागत केलंय...
कावळे यांच्या घरी तिसर्या पिढीनंतर कन्यारत्न झाले असून कावळे कुटुंबीयांनी जलोषात स्वागत केले. कन्यारत्नाचे घरी येताच घरातील सुवासिनी कन्येसह तिच्या आईला औक्षण केले.
कन्यारत्न येणार्या मार्गावर फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या. यासह घराला सुंदर सजावट केले होेते. लक्ष्मीच्या रूपाने चिमुकली आपल्या घरी आली, या भावनेने तिची पाऊलं कुंकवाच्या पाण्यात भिजवून घरात उमटविली गेली.
त्यानंतर देवघरात दर्शन घेऊन चिमुकलीला आकर्षक फुलांनी सजविलेल्या पाळण्यात ठेवण्यात आले. लेकीच्या स्वागतसाठी मोठी जय्यत तयारी करण्यात आली होती. याचवेळी कुटुंबीयांकडून एक आगळा संदेश देत मुलगी वाचावा, असा संदेश दिला.
आजही अनेक ठिकाणी मुलगी जन्मली की तिचा तिरस्कार केला जातो, मात्र कावळे परिवारामध्ये तीन पिढ्यानंतर घरात मुलगी जन्मल्यामुळे तिचे जंगी स्वागत करून समाजापुढे एक नवीन आदर्श ठेवण्यात आला.
कुटुंबात जन्मलेल्या कन्यारत्नाचे वाजत गाजत रथातून मिरवणूक काढून फटाके वाजवीत घरी स्वागत करण्यात आलं. यावेळी परिसरातील नागरिकांनी आणि नातेवाईकांनी फुलांची उधळण करत या चिमुकलीचे स्वागत केलं.