Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ambedkar Jayanti : महामानवाला अनोखी मानवंदना, एक रुपयावर साकारलं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच चिञ
वसईचे चित्रकार कौशिक जाधव यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त एक रुपयावर आपल्या अनोख्या कलाकृतीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच चिञ साकारलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी द प्रॉब्लेम ऑफ द रुपी इट्स ओरिजन अँड इट्स सोल्युशन (मराठी रुपयाची समस्या) हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शोध प्रबंध होता.
1990 मध्ये भारत सरकारने आंबेडकरांची 100 वी जयंती साजरी करण्याकरता त्यांच्या स्मरणार्थ एक रुपयाचे नाणे ही काढले होते.
म्हणून वसईचे चित्रकार कौशिक जाधव यांनी आपल्या अनोख्या कलाकृतीतून एक रुपयाच्या नाण्यावर डॉ. बाबासाहेबांचे चित्र रेखाटलं आहे.
हे चित्र रेखाटण्याकरता एक रुपयाच्या नाण्यावर वॉटर कलर्सचा वापर करण्यात आला आहे
अवघ्या 30 मिनीटांच्या कालावधीत बारकाईने हे चित्र तयार केले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर वसईतील भाताणे गावातील चित्रकार आणि वसईतील न्यू इंग्लिश स्कूल येथील कलाशिक्षक कौशिक जाधव यांनी ही आगळी वेगळी कलाकृती साकारली
कलाकृतीतून महामानवाला अनोखी मानवंदना दिली आहे.
बाबासाहेबांच एक वाक्य आहे जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची भाकरी आणि एक रुपयाचं पुस्तक घ्या.
या विचारांनी प्रेरित होऊन, ही कलाकृती केली असल्याच मत कौशिक जाधव यांनी व्यक्त केलं आहे.