Akshardham Temple New Jersey : जगातील दुसरं मोठं मंदिर, अमेरिकेतील भव्य अक्षरधाम मंदिराचे डोळे दिपवणारे फोटो पाहा
न्यू जर्सीमधील रॉबिन्सविले येथे BAPS स्वामीनारायण अक्षरधाम या भव्य मंदिराचं 8 ऑक्टोबरला लोकार्पण होणार आहे. हे भारताबाहेर जगातील दुसरे सर्वात मोठे हिंदू मंदिर भव्य उद्घाटनासाठी सज्ज आहे. त्यानंतर ते सर्वसामान्यांसाठी खुले होणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअक्षरधाम मंदिराचा लोकार्पण सोहळा 30 सप्टेंबरपासून सुरू झाला असून परमपूज्य महंत स्वामी महाराज यांच्या उपस्थितीत तो संपन्न होईल.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जगभरातील राष्ट्रप्रमुख आणि नेत्यांनी या प्रसंगी शुभेच्छा दिल्या आहेत.
अलीकडेच, 29 सप्टेंबर 2023 रोजी लिहिलेल्या पत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यू जर्सी येथील अक्षरधामच्या उद्घाटन सोहळ्याबद्दल आनंद व्यक्त केला.
न्यू जर्सीमधील 12,500 स्वयंसेवकांनी 12 वर्षांत श्री स्वामीनारायण अक्षरधाम मंदिर बांधलं आहे. या मंदिराचं बांधकाम 2011 ते 2023 या काळात झालं आहे.
बीएपीएस स्वामीनारायण अक्षरधामचा 10 दिवसांचा भव्य लोकार्पण सोहळा 8 ऑक्टोबर रोजी संपन्न होणार असून या दिवशी मंदिराचं औपचारिकरित्या उद्घाटन पार पडेल.
न्यू जर्सीमधील BAPS स्वामीनारायण अक्षरधाम हा हिंदू कला, वास्तुकला आणि संस्कृतीचा मैलाचा दगड मानला जात आहे.
या भव्य मंदिराचं बांधकाम पाहण्यासारखं आहे. मंदिराच्या खांबांवर सुंदर नक्षीकाम करण्यात आलं आहे.
मंदिरात दिव्यांची सुंदर आरासही करण्यात आली आहे. सूर्याची किरणे मंदिरावर पडल्यावर या भव्य मंदिरांचं सौंदर्य आणखी खुलून दिसतं.
न्यू जर्सी येथील अक्षरधाम मंदिराचा उद्घाटन सोहळा जगभरातील मोठ्या संख्येने भाविकांसाठी पर्वणी ठरणार आहे.