World Senior Citizen Day 2023 : घरातील ज्येष्ठांना आजारांपासून वाचवायचे आहे? 'या' गोष्टी लक्षात ठेवा, घरातील वृद्ध राहतील आनंदी
जर तुमचे आई-वडील किंवा कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य तुमच्यापासून दूर राहत असतील, तर तुम्ही त्यांना वेळोवेळी भेटायला जाणे गरजेचे आहे. त्यांच्या गरजा जाणून घेणे महत्त्वाचे आहे. ते ज्या कोणत्या ठिकाणी राहत आहेत ती जागा सुरक्षित आहे की नाही? तेथे कोणत्या दुरूस्तीची गरज आहे का? साफसफाई नीट केली जात आहे की नाही? इत्यादी गोष्टींवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appते त्यांची औषधे योग्य वेळी घेत आहेत की नाही?, किंवा त्यांना कोणतेही औषध घेताना काही समस्या येत आहेत की नाही? हे पाहा. डॉक्टरांकडून वेळोवेळी त्यांची तपासणी करून घ्या.
त्यांना त्यांचे दैनंदिन काम करण्यात अडचण येत असेल तर त्यांच्यासाठी केअर टेकर ठेवा. त्यांना आंघोळ, स्वयंपाक, खाणे, चालणे इत्यादीमध्ये अडचण येत असेल तर तुम्ही त्यांच्याकरता काही वेळ काढा.
वाढत्या वयाबरोबर चालणे आणि उठणे कठीण होते. अशा परिस्थितीत, बहुतेक वृद्ध लोक पडतात. हे अपघात टाळण्यासाठी घरात काही बदल करून घ्यावेत. मोठ्या प्रकाशाचे दिवे लावावेत, बाथरूममध्ये त्यांना पकडण्याकरता हँडल लावा. असे केल्याने त्यांना त्रास होणार नाही.
त्यांना चांगले सामाजिक जीवन मिळेल याची खात्री करण्याचा प्रयत्न करा. त्यांना रोज थोडा वेळ बाहेर घेऊन जा. जर त्यांना चित्रपट पाहायला आवडत असतील तर त्यांना चित्रपट दाखवा.
ते मानसिकदृष्ट्या निरोगी राहतील आणि नैराश्य, चिंता, ताण इत्यादीपासून दूर राहतील याची विशेष काळजी घ्या. त्याकरता त्यांच्याशी संवाद साधा. खूप खूप बोला.
कधीतरी त्यांना एकाच ठिकाणी बसून खूप कंटाळा येतो. अशा वेळी त्यांना ट्रिपला घेऊन जा. त्यांना आवडणाऱ्या ठिकाणी शक्यतो त्यांना घेऊन जा. अशाने ते खूप आनंदी राहतील.
घरातल्या वृद्धांना वेगवेगळ्या सामाजिक कार्यात सहभागी होण्याकरता प्रोत्साहीत करा. त्यांना आवडणाऱ्या गोष्टी करू द्या.
वय जसे वाढत जाते तसे घरातील वृद्ध लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबबादारी घेणे गरजेचे आहे. त्याकरता त्यांना वेळेत जेवण देणे , वेळेत झोपायला सांगणे हे महत्वाचे आहे.
घरातील वृद्धांना त्यांच्या नातवांसोबत वेळ घालवू द्यात. त्यात त्यांना मोठा आनंद मिळतो.