World Milk Day 2022 : जागतिक दूध दिनानिमित्त जाणून घ्या दुधाचा इतिहास
जागतिक अन्न आणि कृषी संशोधन परिषदेच्या निर्देशानुसार 2001 पासून दरवर्षी 1 जून रोजी संपूर्ण जगभरात 'जागतिक दूध दिन' साजरा केला जातो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमानवी शरीराला दुधाची असलेली गरज आणि त्याचे महत्त्व पटवून देण्यासाठीच जागतिक दूध दिन साजरा केला जातो. लोकांपर्यंत दुधाचा प्रचार आणि प्रसार करणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.
हा दिवस साजरा करण्याचा उद्देश दुधाच्या सर्व पैलूंच्या बाबतीत सामान्य जनतेमध्ये जागरुकता निर्माण करणे असा आहे. जागतिक दूध दिवसाद्वारे लोकांना दुधाचं उत्पादन, दुधाच्या पौष्टिकतेचं महत्त्व आणि दुधाच्या विविध उत्पादनांसह याचं आर्थिक महत्त्व समजावलं जातं.
2022 मधील जागतिक दूध दिनाची थीम हवामान बदलाच्या संकटाकडे लक्ष वेधून घेणे आणि डेअरी उद्योग पर्यावरणावरील प्रभाव कसा कमी करू शकतो याकडे लक्ष वेधणे अशी आहे.
हरितगृह वायू उत्सर्जन कमी करून आणि पुढील 30 वर्षांत कचरा व्यवस्थापनात सुधारणा करून 'डेअरी नेट झिरो' गाठण्याचे उद्दिष्ट आहे.
निरोगी आहारासाठी दूध हे सर्वात महत्वाचे पोषक घटक आहे. हे केवळ आवश्यक प्रथिने, चरबी आणि जीवनसत्त्वेच देत नाही तर दुधाचे अनेक आरोग्य फायदे देखील आहेत.
दुधामुळे हाडे फ्रॅक्चर आणि ऑस्टिओपोरोसिस सारख्या आजारांपासून बचाव होतो.
दूध प्यायल्याने हृदयविकार आणि पक्षाघाताचा धोका कमी होण्यास मदत होते.