World Emoji Day 2022 : 'वर्ल्ड इमोजी डे' का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास
आपण सोशल मीडियावर इतरांशी संवाद साधतो. यावेळी आपण आपल्या मनातील किंवा चेहऱ्यावरील हावभाव उत्तमरित्या दाखवण्यासाठी इमोजीचा वापर करतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकधी-कधी आपल्या भावना सांगणं किंवा एखाद्याला समजावणं कठीण होतं, अशा वेळी इमोजी आपल्यासाठी फायदेशीर ठरतात.
इमोजीचं महत्त्व दाखवण्यासाठी 17 जुलै रोजी 'वर्ल्ड इमोजी डे' (World Emoji Day 2022) साजरा केला जातो.
संवाद साधताना इमोजी आपल्याला भाषेची बंधन तोडण्यात मदत करतात. कारण इमोजीमुळे तुमच्या भावना योग्यप्रकारे समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचतात.
इमोजीचा शोध जपानमध्ये लागल्याचं सांगितलं जातं. इमोजी पहिल्यांदा जपानमध्ये 90 च्या दशकात वापरले जायचे. त्यानंतर हळूहळू ते जगभरात पसरले. 2010 नंतर,इमोजींचा वापर वाढू लागला आणि आता हे इमोजी वेबसाइट्स आणि अॅप्समध्ये वापरले जातात.
इमोजीपीडियाचे (Emojipedia) संस्थापक जेरेमी बर्गे (Jeremy Burge) यांनी 2014 मध्ये 'इमोजी डे' साजरा करण्यास सुरुवात केली होती.
इमोजीपीडिया ही एक ऑनलाइन वेबसाइट आहे जी युनिकोड मानक म्हणून इमोजी आणि त्यांच्या डिझाइनची सॉफ्टवेअरमध्ये नोंदणी करते. 2010 मध्ये इमोजींचा वापर वाढला आणि 'वर्ल्ड इमोजी डे' जगभरात साजरा होण्यास सुरुवात झाली.