World Coconut Day 2022 : नारळाचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत आहेत का?
जागतिक नारळ दिवस हा मुख्यतः आशियाई पॅसिफिक देशांमध्ये साजरा केला जातो. पहिल्यांदा हा दिवस 2 सप्टेंबर 2009 रोजी साजरा करण्यात आला. APCC च्या स्थापनेसाठी जागतिक नारळ दिन साजरा केला जातो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजगभरात नारळाचे उत्पादन घेतले जाते, पण आग्नेय आशियात त्याचे सर्वाधिक उत्पादन घेतलं जातं. नारळाच्या उत्पादनाच्या बाबतीत इंडोनेशियाचा जगात पहिला क्रमांक लागतो. भारतातही कोकण किनारी, गुजरात पासून ते केरळपर्यंत आणि पूर्व किनाऱ्याच्या पश्चिम बंगालपासून ते तामिळनाडूपर्यंत नारळाचे उत्पादन घेतलं जातं.
एशियन पॅसिफिक कोकोनट कम्युनिटी (APCC) ची स्थापना लक्षात ठेवणे हे जागतिक नारळ दिन साजरा करण्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. या दिवशी नारळाचे महत्त्व आणि फायदे सांगितले जातात. हा दिवस खास बनवण्यासाठी नारळ पाणी, खोबरेल तेल आणि दुधाला विशेष महत्त्व आहे.
अगदी तहान भागविण्यापासून ते फर्निचर तयार करण्यापर्यंत नारळाचे असंख्य असे फायदे आहेत. नारळामध्ये कार्बोहायड्रेट्स, मॅगनिज आणि प्रोटिन मोठ्या प्रमाणावर असतं. त्यामुळे आपले आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते.
नारळामध्ये आयर्न आणि सेलेनियम असते. ते एक अॅन्टिऑक्सिडन्ट स्वरुपात काम करते, त्यामुळे लाल रक्त पेशींचे संरक्षण होते.
नारळात व्हिटॅमिन, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम हे घटक असतात. त्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात येते. नारळाचे पाणी रोज प्यायल्यास शरीरातील ग्लुकोजचे प्रमाण स्थिर राहते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.