Women's Day : आंतरराष्ट्रीय महिला दिन का साजरा केला जातो ? हा आहे त्यामागचा इतिहास !
या दिवशी आपण अशा महिलांचे स्मरण करतो ज्यांनी देशाचा गौरव केला आहे,एक विशेष प्रतिमा निर्माण केली आहे . [Photo Credit : Pexel.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविशेष म्हणजे या दिवशी त्या महिलांचे स्मरण केले जाते. ज्यांनी आपल्या जिद्दीने पुढे जाऊन अनेक उंची गाठली आहेत. [Photo Credit : Pixabay.com]
तसेच प्रत्येक कुटुंब आपल्या घरातील महिलांना शुभेच्छा देऊन हा दिवस साजरा करतात. आपण या दिवसाचा इतिहास जाणून घेणार आहोत.[Photo Credit : Pexel.com]
दरवर्षी आपण 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करतो आणि या दिवशी देशभरातील आणि जगभरातील लोक महिलांना शुभेच्छा देतात आणि त्यांना विशेष वाटतात. [Photo Credit : Pexel.com]
8 मार्च 1908 रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री-कामगारांनी रुटगर्स चौकात एकत्र येऊन प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली. [Photo Credit : Pixabay.com]
दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता या मागण्या केल्या. या दोन मागण्यांबरोबरच लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमीनिरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा अशी मागणीही केली. [Photo Credit :Pixabay.com]
1910 साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत, 8 मार्च 1908 रोजी अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, 8 मार्च हा `जागतिक महिला-दिन' म्हणून स्वीकारावा हा क्लारा यांनी मांडलेला ठराव पास झाला. [Photo Credit : Pixabay.com]
भारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस 8 मार्च 1943 रोजी साजरा करण्यात आला. 8 मार्च 1971 ला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे 1975 हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. [Photo Credit : Pexel.com]
हा दिवस विशेषतः जगभरातील महिलांवरील भेदभाव संपवण्यासाठी साजरा केला जातो. याशिवाय महिलांचा विकास लक्षात यावा आणि त्यांच्या कर्तृत्वाचाही विचार व्हावा म्हणून हा दिवस साजरा केला जातो. [Photo Credit : Pexel.com]
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.[Photo Credit : Pexel.com]