Aloe vera facial : कोरफडी चे होममेड फेशियल ट्राय करा, चेहऱ्यावर येईल चमक !
हिवाळ्यात कोरडी हवा आणि थंडीचे कारण चेहरा कोमेजतो. थंडीत चेहऱ्याची चमक नाहीशी होते असे वाटते आणि अशा परिस्थितीत महागडे फेशियल देखील प्रभावी ठरत नाही. [Photo Credit : Pexel.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपण तुम्हाला कदाचित माहित नसेल की कोरफडीच्या फेशियलमुळे हिवाळ्यात चेहऱ्यावर अप्रतिम चमक येते.कोरफडीमध्ये मध मिसळून चेहऱ्याची मसाज केल्यास ब्युटी पार्लरच्या फेशियलपेक्षा जास्त चमक येऊ शकते. [Photo Credit : Pexel.com]
घरच्या घरी एलोवेरा आणि मधाने फेशियल कसे करता येईल. आम्ही तुम्हाला सांगतो की मध आणि कोरफडीचा हा फेशियल कोणीही करू शकतो. [Photo Credit : Pexel.com]
असे करा कोरफड आणि मधाचे फेशियल: सर्वप्रथम तुम्हाला कोरफडीच्या पानांपासून काढलेले ताजे जेल घ्यावे लागेल. एका भांड्यात घ्या आणि त्यात थोडे मध घाला. [Photo Credit : Pexel.com]
चांगल्या परिणामांसाठी, तुम्ही त्यात व्हिटॅमिन ईच्या दोन कॅप्सूल देखील घालू शकता. हे तीन घटक चांगले मिसळा आणि अशा प्रकारे एक गुळगुळीत क्रीम किंवा पेस्ट तयार होईल. [Photo Credit : Pexel.com]
आता सर्वप्रथम हातामध्ये थोडे कोरफडीचे जेल घ्या आणि चेहऱ्यावर लावा, मसाज करा आणि कापसाने पुसून टाका. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील घाण निघून जाईल. [Photo Credit : Pexel.com]
आता ही पेस्ट आपल्या बोटांवर लावा आणि सुमारे 15 ते 20 मिनिटे चेहऱ्याला मसाज करा. तुम्हाला संपूर्ण चेहऱ्याला गोलाकार वर्तुळात मसाज करावे लागेल . [Photo Credit : Pexel.com]
तुमचे हात हनुवटीपासून कपाळापर्यंत हलवावे लागतील जसे पार्लरमध्ये फेशियल केले जाते. नीट मसाज केल्यानंतर, कोमट पाण्याने चेहरा धुवा आणि टॉवेलने पुसून टाका. [Photo Credit : Pexel.com]
कोरफड आणि मधाच्या फेशियलचे फायदे: कोरफड त्वचेसाठी खूप चांगली आहे. हे त्वचेला मॉइश्चरायझ करते आणि चेहऱ्यावर साचलेली घाण साफ करते. यामुळे तुमची मृत त्वचा दुरुस्त होते आणि त्वचा घट्ट होते.[Photo Credit : Pexel.com]
मध त्वचेला निरोगी तर बनवतेच पण ती मऊ आणि चमकदार बनवते. मधामध्ये अँटी-ऑक्सिडंट्ससोबतच व्हिटॅमिन ए आणि ई देखील असतात जे त्वचेसाठी चांगले असतात. [Photo Credit : Pexel.com]
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. [Photo Credit : Pexel.com]