Mithun Chakraborty : 'डिस्को डान्सर' मिथुन चक्रवर्ती रुग्णालयात दाखल...

अभिनेते आणि राजकारणी मिथुन चक्रवर्ती यांच्या प्रकृतीशी संबंधित एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. (Photo Credit : PTI)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मिथुन चक्रवर्ती यांना कोलकाता येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Photo Credit : PTI)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,मिथुन यांना छातीत दुखू लागलं आणि अस्वस्थता जाणवू लागली. त्यानंतर तात्काळ त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. (Photo Credit : PTI)
सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. तसेच त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं देखील सांगण्यात आलं आहे. (Photo Credit : PTI)
मिथुन चक्रवर्ती यांना ब्रेनस्ट्रोक झाल्याची माहिती समोर आली आहे. (Photo Credit : PTI)
मिथुन यांचं सध्या वय हे 73 वर्ष आहे. शनिवार 10 फेब्रुवारी रोजी मिथून यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. (Photo Credit : PTI)
मिथुन चक्रव्रर्ती यांना पद्म भूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. (Photo Credit : PTI)
बॉलिवूडचा 'डिस्को डान्सर' म्हणून मिथुन चक्रवर्ती यांना ओळखले जाते. मिथुन चक्रवर्ती यांनी अभिनय, अॅक्शन आणि नृत्य अशा तिन्ही गोष्टींमध्ये प्रभुत्व मिळवले आहे. (Photo Credit : PTI)
त्यांनी बंगाली, हिंदी, ओरिया, भोजपुरी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि पंजाबी अशा विविध भाषांमध्ये 350हून अधिक चित्रपट केले आहेत. (Photo Credit : PTI)
मिथुन यांनी 1976 साली 'मृगया' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. पहिल्याच चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. (Photo Credit : PTI)