Ganeshotsav 2024 : आली माझी गौराई! गौरी पूजनाला दोन्ही हात दिसतील शोभून, 'या' स्पेशल मेहंदी डिझाईन्स एकदा पाहाच
गणपती बाप्पाचं आगमन 7 सप्टेंबरला झालंय. आज गौरी आवाहन असून बुधवारी गौरी पूजन आहे. बाळ गणेशाचा कौतुक सौहळा पाहण्यासाठी देवी पार्वती पृथ्वीवर येते अशी मान्यता आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगौरी पूजनात महिला पार्वतीची पूजा करतात. हा सण महाराष्ट्रात साजरा केला जातो. गौरी पूजन दरवर्षी गणेश चतुर्थीच्या चौथ्या किंवा पाचव्या दिवशी होते. या दिवशी देवीचे आवाहन केले जाते. त्यांचा आदर केला जातो. दुसऱ्या दिवशी मातेची मुख्य पूजा होते आणि तिसऱ्या दिवशी देवीला निरोप दिला जातो.
गौरी पूजन सामान्यतः आनंद आणि समृद्धीसाठी केले जाते. देवीला प्रसन्न केल्याने घरात समृद्धी येते आणि संपत्ती वाढते.
गौरी पूजन केल्याने पती-पत्नीमधील संबंध सुधारतात. याशिवाय मार्गात येणारे अडथळे दूर होऊन इच्छित आणि योग्य जीवनसाथी मिळतो. अशी मान्यता आहे.
देवांमध्ये सर्वोच्च असलेल्या श्री गणेशाची पूजा करून सुरुवात करा. सर्वप्रथम गणपतीला गंगाजलाने स्नान करावे.
नंतर त्यांना पंचामृताने स्नान करून पुन्हा गंगाजलाने स्वच्छ कपड्याने पुसून आसनावर ठेवावे.
यानंतर माता गौरीला आपल्या घरी येऊन सिंहासनावर बसण्यासाठी आमंत्रण द्या.
आता वस्त्र अर्पण करा, उदबत्ती दाखवा आणि फुलांच्या माळा, प्रसाद आणि दक्षिणा द्या.
पूजेच्या वेळी ओम गौरये नमः आणि ओम पार्वतेय नमः या मंत्रांचा जप करावा