विमानातलं जेवणं बेचव, कमी मिठाचं का असतं? यामागे आहे मोठं कारण...
विमानानं प्रवास करणं आजकाल खूप सोपं झालं आहे. अनेक वेळा प्रवासी लांब पल्ल्याच्या प्रवासात जेवणाची ऑर्डर देतात. पण तुम्ही कधी विचार केलाय का की विमानात प्रवाशांना जेवण चवदार का वाटत नाही?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआजकाल बहुतेक लोक विमानानं प्रवास करणं पसंत करतात. विमानात सगळ्या सोयी-सुविधा असतात. तुम्हाला जेवण, ड्रिंक्स दिल्या जातात. पण विमानात दिलं जाणारं जेवण कुणाला फारसं आवडत नाही...?
फ्लाईटनं प्रवास करताना प्रवाशांना दिलं जाणारं जेवण फारसं आवडत नाही, हे तुम्हाला माहिती आहे का? विमानातलं जेवण काहीसं बेचव आणि कमी मिठाचं असतं. पण असं का?
यावर काही संशोधन झालीत... अनेक संशोधनांमध्ये एका गोष्टीवर एकमत झालं आहे की, हवेत उंचावर गेल्यावर आपल्या जिभेवर रेंगाळणाऱ्या पदार्थांच्या चवीवर वेगळा परिणाम होतो.
हा परिणाम केवळ चवीवरच नाही तर, वास घेण्याच्या आणि पाहण्याच्या क्षमतेवरही होतो. तसेच, या सर्व गोष्टी मिळून आपल्या अन्नाची चव आपल्या इंद्रियांपर्यंत पोहोचवतात, त्यामुळे त्यात बदल दिसू लागतो.
तज्ज्ञांच्या मते, याचाच तुमच्या इंद्रियांवर परिणाम होतो. यामुळेच तुम्हाला जेवण चांगलं आणि चविष्ट वाटत नाही. यामध्ये दोष फक्त अन्नाचाच नाही तर परिस्थितीचाही आहे.
डॉ. रॉबर्ट यांच्या मते, फ्लाईट दरम्यान केबिनमध्ये हवेचा दाब कमी असतो, आर्द्रतेची कमतरता असते आणि आवाजाची पातळी जास्त असते. याचा परिणाम आपल्या वास घेण्याच्या क्षमतेवर होतो. पुरेशा आर्द्रतेशिवाय आपण वास घेऊ शकत नाही.
आपल्या सर्वांना माहीत आहे की, वास आणि चव यांचा एकमेकांशी संबंध आहे, म्हणून आपल्या घरातील अन्न तितकं चवदार वाटत नाही.
अनेक संशोधनांमध्ये असं म्हटलं गेलं आहे की, 30 हजार फूट उंचीवर आपल्याला गोड, खारट आणि मसालेदार 20 ते 30 टक्के कमी जाणवू शकतात. तर उमामी चव म्हणजे, मोनोसोडियम ग्लूटामेट लगेच कळतात.
अशा परिस्थितीत पनीर, मशरूम, चीज, टोमॅटो, मांस किंवा सीफूड खालं तर त्याची चव अधिक उत्तम लागते.