Health Tips : Irritable bowel syndrome म्हणजे काय? या आजारात कोणत्या गोष्टी खाऊ नयेत? जाणून घ्या लक्षणं आणि उपचार
बर्याच लोकांना इरिटेबल बाॅवेल सिंड्रोम (IBS) चा त्रास होतो. ही पोटाशी संबंधित गंभीर समस्या असू शकते, जर त्याची लक्षणे वेळेवर ओळखली गेली नाहीत आणि त्यावर उपचार केले गेले नाहीत तर ही समस्या गंभीर होऊ शकते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appइरिटेबल बॉवेल सिंड्रोम लक्षणे - पोटदुखीच्या त्रासाबरोबर जुलाब , पोट न दुखता केवळ जुलाब ओटीपोटात, पोटात उजवीकडे आणि डावीकडे, वरच्या पोटात दुखते , पोट अधुनमधून दुखते, पोटात कळ येते.
कधीकधी सतत सौम्य वेदना असतानाच एकदम जोरात कळ येते , काहीही खाल्ल्यानंतर वेदना वाढते, मानसिक ताणांमुळे दुखणे अधिक जाणवते , स्त्रियांना मासिक पाळी येण्यापूर्वी किंवा पाळी चालू असताना हे त्रास वाढतात.
या आजारावर उपाय काय - भाताची पेज, अधिक पिकलेली केळी, बिया काढून राहिलेला पेरूचा गर, उकडलेले सफरचंद. ज्यांना या विकाराचा जास्तच त्रास होत असेल त्यांनी वेळीच डॉक्टरांचे उपचार घेणे गरजेचे आहे.
इरिटेबल बाॅवेल सिंड्रोममध्ये हे पदार्थ खाऊ नका - बीन्स, मसूर- जर तुम्हाला इरिटेबल बाॅवेल सिंड्रोमची समस्या असेल तर तुम्ही बीन्स, मसूर, मटार यांसारखे पदार्थ खाऊ नये कारण त्यात काही घटक असतात ज्यामुळे त्याची लक्षणे वाढू शकतात.
जर तुम्हाला इरिटेबल बाॅवेल सिंड्रोम असेल तर तुम्ही कार्बोनेटेड पेये अजिबात घेऊ नये. या पेयांचा आतड्यांवर प्रभाव पडतो आणि अतिसार होऊ शकतो. त्यांचे सेवन टाळणे चांगले.
इरिटेबल बाॅवेल सिंड्रोमच्या बाबतीत, कोबी, फ्लॉवर, ब्रोकोली, ब्रसेल्स स्प्राउट्स यांसारख्या भाज्या खाऊ नका, कारण त्यात फायबरचे प्रमाण खूप जास्त असते आणि त्यामुळे इरिटेबल बाॅवेल सिंड्रोमची लक्षणे वाढू शकतात.
लसूण आणि कांदा हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असले तरी आयबीएसच्या बाबतीत त्यांचे सेवन देखील टाळावे. त्यामध्ये असलेल्या फ्रक्टन्समुळे आतड्यांमध्ये समस्या निर्माण होऊ शकतात.
तुम्हाला इरिटेबल बाॅवेल सिंड्रोम असल्यास, तुमचे जेवण साधे आणि घरगुती ठेवण्याचा प्रयत्न करा. जास्त मसालेदार अन्न खाल्ल्याने पोटदुखी आणि जळजळ होण्याची समस्या वाढू शकते.
मिरचीमध्ये असलेल्या कॅप्सेसिन या घटकामुळे हे घडते. तुमचे पोट निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही फक्त साधे, ताजे, कमी मसालेदार पदार्थ खावेत.