Health Tips : ३० दिवस भात न खाल्ल्याने शरीरात काय बदलू शकतात? जाणून घ्या
वरिष्ठ आहारतज्ज्ञांनी सांगितले की, “एका महिन्यासाठी तांदूळ पूर्णपणे सोडून दिल्यास काही प्रमाणात वजन कमी होऊ शकते. रक्तातील ग्लुकोजची पातळी अधिक असल्यास तुम्हाला भात खाणे सोडून देण्याची मोठी मदत होऊ शकते.”(Photo Credit : Unsplash)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपण जेव्हा तुम्ही आहारातून तांदूळ काढून टाकता केवळ त्याच कालावधीसाठी रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ शकते. भात पुन्हा खायला सुरुवात केली की, ग्लुकोजच्या पातळीत पुन्हा चढ-उतार होऊ लागतात. (Photo Credit : Unsplash)
भात न खाल्ल्याने होणाऱ्या नुकसानाविषयी तज्ज्ञ सांगतात की,”तांदळाच्या अभावाने फायबरचे प्रमाण कमी झाल्यामुळे पचनक्रियेवरही परिणाम होऊ शकतो. (Photo Credit : Unsplash)
वजन कमी होईल पण का? उर्जा उत्पादनासाठी कार्ब्स अत्यंत आवश्यक आहेत आणि ते पूर्णपणे काढून टाकणे हे शरीराला कमकुवत बनवू शकते. कार्ब्सच्या अभावी शरीर उर्जा निर्माण करण्यासाठी स्नायूंमधील प्रथिने वापरण्यास सुरवात करते.(Photo Credit : Unsplash)
शरीराच्या अन्य गरजांसाठी लागणारी जीवनसत्त्वे आणि खनिजांची कमतरता देखील जाणवते. भात खाणे बंद केल्याने कमी झालेले वजन हे चरबी नसून स्नायू कमकुवत होण्याचा परिणाम असू शकतो.(Photo Credit : Unsplash)
तांदूळ कार्ब्स, बी जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचा स्रोत असल्याने ते पौष्टिक ठरू शकतो. असे तज्ज्ञांचे मत अहे. (Photo Credit : Unsplash)
एक लहान वाटी भात योग्य पद्धतीने खाल्ल्याने शरीराला कोणतीही हानी होत नाही, आहारातून तांदूळ पूर्णपणे काढून टाकण्याचा निर्णय घेणे चुकीचे आहे. मुळात भात कसा खावा हे समजून घेणे आवश्यक आहे. (Photo Credit : Unsplash)
भाताचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे, कारण तुम्ही काय खाता त्यापेक्षा तुम्ही किती खाता हा प्रश्न सुद्धा महत्त्वाचा आहे.(Photo Credit : Unsplash)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : Unsplash)