Weight Loss Tips : लठ्ठपणा कमी करण्यासाठी 'हे' पाणी प्या; झटपट वजन होईल कमी

आजकाल लोक लठ्ठपणाची सर्वाधिक काळजी करतात. प्रत्येकजण वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असतो. अशा परिस्थितीत तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी जर पाणी प्यायलात तर तुमचे वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करू शकते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
वजन कमी करण्यासाठी रोज सकाळी वेगवेगळ्या प्रकारचे पाणी प्यावे. यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत होईल आणि गॅस, अपचन, कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब आणि मधुमेह यांसारख्या समस्याही दूर होतील.

जिर्याचे पाणी- जिर्याचे पाणी वजन कमी करण्यासही उपयुक्त आहे. रिकाम्या पोटी जिऱ्याचे पाणी प्यायल्याने चरबी कमी होऊ लागते. यासाठी 1 ग्लास पाण्यात 1 चमचे जिरे टाका आणि रात्रभर राहू द्या. हे पाणी सकाळी गाळून प्यावे.
बडीशेप पाणी- बडीशेपचे पाणी फायबरने भरपूर प्रमाणात असल्याने वजन कमी करण्यास मदत होते. यामुळे पोट आणि पचनक्रिया चांगली राहते. यासाठी 1 चमचे बडीशेप 1 ग्लास पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. हे पाणी सकाळी उकळून कोमट प्यावे.
अजवाइन पाणी- अजवाईनचे पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते. अजवाइन पोटासाठी खूप चांगले मानले जाते. यासाठी 1 ग्लास पाण्यात 1 चमचे बिया टाका आणि रात्रभर भिजवा. हे पाणी सकाळी गाळून प्या.
लिंबूपाणी - वजन कमी करण्यासाठी लिंबू पाणी सर्वात प्रभावी आहे. लिंबूपाण्यात कॅलरी कमी आणि व्हिटॅमिन सी भरपूर असते. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. यासाठी रोज सकाळी कोमट पाण्यात अर्धा लिंबू प्या.
मेथीचे पाणी- मेथीचे पाणी वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. रोज सकाळी मेथीचे पाणी प्यावे. यासाठी 1 चमचे मेथीचे दाणे 1 ग्लास पाण्यात रात्रभर भिजत ठेवा आणि सकाळी गाळून हे पाणी प्या.