Vastu Tips For Kitchen : 'या' गोष्टी स्वयंपाकघरात ठेवल्या तर होईल मोठे नुकसान, पाहा
घरातील स्वयंपाकघर ही जागा अतिशय महत्वाची असते. जिथे देवी अन्नपूर्णाचा वास असतो. या देवीमुळे परिवार सुख-समाधानात राहतो. परिवारातील प्रत्येक सदस्य खुशाल राहतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतुम्ही जर स्वयंपाकघरात औषधे ठेवत असाल तर ते ठेवणे पूर्णत:बंद करा. यामुळे नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करू शकते.
स्वयंपाकघरात कोणतीही गोष्ट ठेवण्याकरता प्लास्टिकचे डबे किंवा भांडे यांचा वापर करू नये.जे आरोग्यावर परिणाम करू शकतात. प्लास्टिकमुळे राहु दोष होऊ शकतो.
जर तुम्ही स्वयंपाकघरात आरसा लावला असेल तर आणि त्यात गॅसची आग दिसत असेल तर तो आरसा लगेच घरातून काढून टाका. यामुळे वास्तु दोष होऊ शकतो.
बहुतेक घरांमध्ये, लोक त्यांच्या स्वयंपाकघरात डस्टबिन ठेवतात जेणेकरून स्वयंपाक करताना होणारा कचरा त्यात टाकता येईल. आपण हे आपल्या सोयीसाठी करतो पण वास्तुनुसार असे करणे चुकीचे आहे. कचरा हे नकारात्मकतेचे प्रतीक आहे आणि ते तुमच्या आरोग्यावर आणि आर्थिक प्रगतीवर परिणाम करू शकते.
स्वयंपाकघरात कप, ताट, तवा किंवा इतर कोणतेही भांडे तुटले तर ते ताबडतोब काढून टाकावे. तुटलेली भांडी स्वयंपाकघरात ठेवू नका, ते अशुभ मानले जाते. तुटलेली भांडी दुर्दैव आणि गरिबी वाढवतात.
झाडूला देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते पण ते कधीही स्वयंपाकघरात ठेवू नका. स्वयंपाकघरात झाडू ठेवल्याने कुटुंबातील सदस्यांमधील विश्वास कमी होतो आणि घराच्या सुख-शांतीला बाधा येते. यामुळे तुमचे आर्थिक नुकसानही होऊ शकते.
वास्तुशास्त्रानुसार देवी-देवतांची चित्रे किंवा कॅलेंडरचा वापर स्वयंपाकघरात करू नये. वास्तुनुसार हे योग्य नाही. कारण स्वयंपाकघरात मंगळाचा प्रभाव जास्त असतो आणि गुरूचा प्रभाव पुजेच्या वस्तूंवर वाढतो.यामुळे मोठे नुकसान होऊ शकते.
गॅस स्टोव्ह आणि सिंक एकाच दिशेने नसावेत. असे केल्याने तुम्हाला जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. स्टोव्ह आणि सिंक वेगवेगळ्या दिशेने असावेत. स्टोव्हसाठी सर्वोत्तम दिशा आग्नेय मानली जाते कारण ती राहूची दिशा असल्यामुळे जेवणाची चव वाढते. सिंक उत्तर-पश्चिम दिशेला ठेवता येते.
खराब झालेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू ताबडतोब स्वयंपाकघरातून बाहेर फेकल्या पाहिजेत किंवा त्या दुरुस्त कराव्यात. वास्तुशास्त्रात असे मानले जाते की अशा गोष्टींचा परिणाम मुलांच्या करिअरवर होतो. तुमच्या स्वयंपाकघरात या गोष्टी असतील तर आजच फेकून द्या.