Snake Bite First Thing To Do : साप चावला आहे? वैद्यकीय मदत मिळण्याकरता देखील उशीर होत आहे? करा 'हे' उपाय
साप चावला तर काय करावे? शक्य तितक्या लवकर वैद्यकीय मदत घ्यावी. परंतु काही वेळा तत्काळ वैद्यकीय मदत मिळणे शक्य होत नाही. त्यामुळे साप चावल्यावर प्रथम काय करावे आणि कोणत्या चुका टाळाव्यात हे प्रत्येक व्यक्तीला माहित असणे आवश्यक आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसर्व प्रकारच्या सापाच्या विषावर उपचार केले जाऊ शकतात असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे, परंतु तुम्हाला माहिती आहे का की सर्पदंशामुळे लाखो लोकांचा मृत्यू होतो.
जगभरात दरवर्षी अंदाजे 5 दशलक्ष साप चावल्याचा अभ्यासाचा अंदाज आहे. यापैकी 81,000 ते 138,000 लोकांचा मृत्यू होतो आणि सुमारे 400,000 लोकांना कायमचे अपंगत्व येते.
भारतात सापांच्या 300 हून अधिक प्रजाती आढळतात. त्यापैकी जवळपास 60 प्रजाती विषारी आहेत.
अहवालानुसार, एखाद्या व्यक्तीला वेळेवर आणि योग्य उपचार मिळाले तर सर्पदंशातूनही वाचवता येते.
चावलेल्या भागातून कापड काढा. किंवा तुमच्याकडे अंगठी, अँकलेट, ब्रेसलेट असे काही दागिने असतील तर तेही काढून टाका. असे न केल्यास आणखी समस्या निर्माण होऊ शकतात.
डब्ल्यूएचओच्या मते, बहुतेक विषारी सापांनी चावल्यानंतर मृत्यूचा धोका नसतो. मात्र चावलेल्या व्यक्तीला कोणत्याही ठिकाणी नेण्यासाठी तात्पुरते स्ट्रेचर वापरा.
तीव्र वेदना झाल्यास पॅरासिटामॉल दिले जाऊ शकते. साप चावल्यास उलट्या होऊ शकतात. त्याकरता व्यक्तीला डाव्या अंगावर झोपवावे.
सापाचे विष शरीराच्या इतर भागात पसरू नये यासाठी तातडीने प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी ती जागा घट्ट बांधावी.
जर तुम्हाला साप चावला तर ताबडतोब रुग्णवाहिका बोलवा आणि त्या व्यक्तीला सापापासून दूर घेऊन जा.