Home Remedies For Period Pain : मासिक पाळीमध्ये होतात प्रचंड वेदना? मग 'या' रामबाण घरगुती उपायांनी मिळू शकतो आराम!
मासिक पाळीत अनेक महिलांना पोटदुखी किंवा गॅसच्या समस्येला सामोरे जावे लागते. मासिक पाळीच्या कालावधीत सुमारे 80 टक्के स्त्रिया या समस्येला सामोरे जातात. हार्मोनल बदलांमुळे या समस्या प्रामुख्याने महिलांमध्ये पाहायला मिळतात. ही समस्या खरेतर थोड्याशा आरामाने कमी होऊ शकते. मात्र तुमच्या काही वाईट सवयी या समस्या वाढवू शकतात. तर यावर काही घरगुती उपाय तुम्ही करू शकता पाहा.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबाहेरील अन्नामध्ये मिठाचे प्रमाण खूप जास्त असते. मिठामुळे पोटात दुखू लागते आणि त्रास वाढतो. त्यामुळे घरीच अन्न शिजवून खाल्ल्यास उत्तम.
आपल्या आहारात त्या गोष्टींचा समावेश करा ज्यात पोटॅशियम, प्रथिने जास्त प्रमाणात असतील. यासाठी केळी, टोमॅटो, ड्रायफ्रूट्स इत्यादींचा आहारात समावेश करा.
तुम्ही जितके जास्त पाणी किंवा इतर पेय प्याल तितके तुम्हाला बरे वाटेल. त्यामुळे ताक, शहाळ्याचे पाणी, ज्युस इत्यादीचा समावेश करा.
त्या दिवसात शरीरात अनेक बदल घडतात ज्यामुळे मूड स्विंग आणि पोटदुखीची समस्या आपल्याला त्रास देते. अशा स्थितीत किमान 8 तासांची झोप घ्या.
अल्कोहोल आणि कॅफिनचे सेवन केल्याने तुम्हाला मोठ्या प्रमाणात अस्वस्थ वाटू शकते. त्यामुळे अल्कोहोल आणि कॅफिनचे सेवन पूर्णपणे टाळा. तसेच चहा आणि काॅफी ऐवजी ग्रीन टीला प्राधान्य द्या.
तुमच्या पोटात गॅस तयार होत असल्यास थोडा वेळ चालल्याने तुम्हाला अराम मिळतो. तु्म्ही नियमीत व्यायाम केल्यास तुमच्या या समस्या आपोआप कमी होतील.
जर तुम्हाला जास्त ताण येत असेल तर तुमच्या मासिक पाळीवर त्याचा खूप परिणाम होतो. म्हणून, आपण शक्य तितके ताण घेणे टाळले पाहिजे आणि योग, ध्यान, मालिश इत्यादींच्या मदतीने तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करा.
तुम्ही जे काही खाता ते विचारपूर्वक खा. पौष्टिक अन्न् खा. एकाच वेळी खूप खाण्याऐवजी दिवसभरात अनेक वेळा थोडे थोडे खा. अन्न नीट चावून खा, यामुळे तुम्हाला आराम मिळू शकतो.
दिवसातून दोन - तीन वेळा खारीक खाणे देखील तुमच्याकरता फायदेशीर ठरू शकते.