Valentines Day 2023 : पहिला व्हॅलेंटाईन डे कधी साजरा करण्यात आला?
14 फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'व्हॅलेंटाईन डे'ला प्रेमी युगुल एकमेकांसमोर आपलं प्रेम व्यक्त करतात.
प्रचलित माहितीनुसार, पहिला व्हॅलेंटाईन डे सन 496 मध्ये साजरा करण्यात आला होता, ही परंपरा आजतागायत कायम आहे.
आजही 14 फेब्रुवारीला जगभरात प्रेमाचा दिवस म्हणजे व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो.
पाचव्या शतकाच्या अखेरीस, पोप गेलेसियस यांनी 14 फेब्रुवारीला 'व्हॅलेंटाईन डे' म्हणून घोषित केला आणि तेव्हापासून हा दिवस जगभरात साजरा केला जातो.
रोमन लोकांसाठी हा एक सण मानला जातो. या दिवशी सामूहिक विवाह देखील होतात.
'ऑरिया ऑफ जेकोबस डी वराजिन' या पुस्तकात व्हॅलेंटाईन डेची कहाणी आहे.
प्रेमाच्या दिवसाला रोमच्या धर्मगुरू 'सेंट व्हॅलेंटाइन' यांचं नाव देण्यात आलं आहे. इसवी 270 मध्ये संत व्हॅलेंटाईन होऊन गेले.
संत व्हॅलेंटाईन यांच्या स्मरणार्थ दरवर्षी 14 फेब्रुवारी हा दिवस त्यांच्या नावाने 'व्हॅलेंटाईन डे' म्हणून साजरा केला जातो आणि याला प्रेमाचा दिवस असंही म्हणतात.
आजही 14 फेब्रुवारीला जगभरात व्हॅलेंटाईन डे साजरा केला जात आहे. पण त्याची सुरुवात प्रथम रोमन फेस्टिव्हलने झाली.