Eid-E-Milad 2023 : ईदच्या निमित्ताने ट्राय करा ; 'या' सोप्या मेजवानी , पाहा रेसिपी
इस्लाम धर्मात पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जन्मदिवसाला मोठं महत्व आहे. पैगंबर हजरत मोहम्मद यांचा जन्मदिन ‘ईद मिलाद उन-नबी’ (Eid-E-Milad) म्हणून साजरा करण्यात येतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज हजरत मोहम्मद यांच्या पवित्र वचनांचं, कुराणाचं पठण केलं जातं. इस्लाम धर्माता दान करण्याला मोठे महत्व आहे. ईद-ए-मिलाद-उन-नबी अनेकजण गोर- गरिबांना अन्नदान करतात.
इस्लाम कॅलेन्डरच्या तिसऱ्या महिन्यातील 12 तारखेला, इसवी सन पूर्व 571 मध्ये पैगंबर हजरत मोहम्मद यांचा जन्म झाला होता. सर्वात आधी हा सण इस्त्रायलमध्ये साजरा करण्यात येत होता. त्यानंतर अकराव्या शतकापासून जगभरात हा सण साजरा करण्यात येऊ लागला.
आज पवित्र कुराण घरे आणि मशिदींमध्ये वाचले जाते. ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या निमित्ताने सर्वत्र मिरवणुका काढण्यात येतात.
ईद मिलाद उन नबीच्या दिवशी प्रार्थना आणि संदेश वाचण्याबरोबरच गरीबांना देणगी देखील दिली जाते. त्यांना जेवण दिले जाते. या
जे लोक मशिदीत जाऊ शकत नाहीत, ते त्यांच्या घरी कुराण पठण करतात.
मशिदीमध्ये नमाज पडण्यात येतात, त्याचवेळी पैगंबरांचा संदेशाचा सर्वत्र प्रसार करण्यात येतो. आजच्या दिवशी गरिबांमध्ये अन्नाचे दान केलं जातं तसेच गरिबांना देणगी देण्यात येते. आजचा हा सण आणखीन खास बनवण्यासाठी या काही मेजवानी तुम्ही घरच्या घरी नक्की ट्राय करा.
तांदळाची खीर ही ईदच्या दिवशी बनवण्याची सर्वात सोपी आणि स्वादिष्ट पाककृती आहे. हे करण्यासाठी अर्धा कप धुतलेला बासमती तांदूळ बारीक करून दोन लिटर उकळलेल्या दुधात मिसळा. यानंतर मंद आचेवर शिजवा. तुम्हाला हवे असल्यास त्यात बदाम आणि वेलची पावडरही टाकू शकता.
शाही मटण बिर्याणी - शाही मटण बिर्याणी तांदूळ, मटण आणि सर्व प्रकारचे मसाले वापरून बनवली जाते. बिर्याणी हा भारतातील सर्वात लोकप्रिय पदार्थांपैकी एक आहे. त्यामुळे सणासुदीच्या दिवसांत बहुतेकांना बिर्याणी खायला आवडते. ईद-ए-मिलादच्या सणाला तुम्ही शाही मटण बिर्याणी बनवू शकता. त्यासाठी प्रथम एक चमचा आख्खा गरम मसाला भाजून पावडर तयार करावी नंतर कांदा,लसूण,आले आणि खोबरे भाजून पेस्ट करून घ्यावी. मटण स्वच्छ धुऊन दही, आले, लसूण, पेस्ट,हळद, मीठ लावून 20 मिनीटे ठेवावे आणि नंतर कुकरला शिजवण्यासाठी अर्धा तास ठेवावे. आता एका मोठ्या पातेल्यात साजूक तूप घालून जीरे आणि गरम मसाल्याची फोडणी करून त्यात तांदूळ मीठ चवीनुसार आणि लिंबू पिळून तांदूळ बुडेल तितकं पाणी घालून हलवून शिजवून घ्यावे. तर दुसऱ्या पातेल्यात कांदा लसूण आले पेस्ट तेलात तेल सुटे पर्यंत परतून घ्यावे आणि नंतर त्यात सगळे मसाले मीठ चवीनुसार घालून परतून घ्यावे. नंतर त्यात शिजवलेले मटण घालून एक कप पाणी घालून हलवून मटण उकळत ठेवावे. सगळा रस्सा सुकला की बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी आणि मटण तयार करून घ्यावे. भात आणि तयार झालेले मटन एकत्र करावे.
शीरखुर्मा म्हणजे खजूर घालून शिजवलेले दूध. बारीक शेवया, दूध आणि खजूर घालून हा स्वादिष्ट पदार्थ बनवला जातो. या डिशमध्ये तुम्ही ड्राय फ्रूट्स देखील घालू शकता.