Travel Tips : फिरायला जायचंय, पण बजेट कमी आहे? मग 'या' पर्यटन स्थळांचा पर्याय ठरेल बेस्ट; लुटा निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद...
निसर्ग सौंदर्याचा आनंद घेत कुटुंबिय किंवा मित्रपरिवारासोबत वेळ घालवण्याची अनेकांची इच्छा असते. पण कमी बजेटमुळे अनेक वेळा ही इच्छा अपुरी राहते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबजेट कमी असेल, पण तुम्हाला फिरायची इच्छा असेल, तर कमी बजेटमध्ये काही उत्तम पर्यटन स्थळांची माहिती जाणून घ्या.
कमी बजेटच्या सुट्टीसाठी मॅक्लॉडगंज (McLeod Ganj) हे सर्वोत्तम ठिकाण आहे. दरवर्षी येथे पर्यटकांची वर्दळ असते. तुम्ही मॅक्लॉडगंजमध्ये 8 हजार ते 10 हजार रुपयांमध्ये 3 ते 4 दिवस फिरू शकता. तुम्ही येथे दाल लेक, भागसुनाथ मंदिर, भागसू फॉल्स, कांगडा किल्ला पाहू शकता.
शिलाँग फिरण्यासाठी खिशात फक्त 10 ते 12 हजार रुपये असले तरी तुम्ही येथे आरामात फिरू शकता. नोहकालिकाई फॉल, मावफ्लांग पवित्र जंगल, रूट ब्रिज, एलिफंटा फॉल ही येथील काही प्रसिद्ध ठिकाणं आहेत.
पर्यटनासाठी तुम्ही उत्तराखंडमधील व्हॅली ऑफ फ्लॉवर्सला (Valley of Flowers) देखील भेट देऊ शकता. जून-जुलै महिना येथे भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ आहे. चहूबाजूला फुलं आणि त्यांचा दरवळणारा सुगंध यामुळे तुम्हाला येथे आल्हाददायक वाटले.
येथे तुम्ही 10, हजार रुपयांमध्ये तीन ते चार दिवस आरामात फिरू शकता. याशिवाय वसुंधरा धबधबा, भीम पुल लक्ष्मण गंगा नदी अशा अनेक ठिकाणांना भेट देता येईल.
शिमला (Shimla) हे भारतातील सर्वोत्तम हिल स्टेशन आहे. इथले सौंदर्य पाहण्यासारखे आहे.निळे आकाश, थंड वारा, सुंदर दऱ्या, सौंदर्य आणि प्रणय इथे प्रत्येक इंचावर राहतो.
शिमलामध्ये तुम्ही मॉल रोड, द रिज, कालीबारी, टेंपल क्राइस्ट चर्चला भेट देऊ शकता. येथे फिरण्यासाठी तुमच्याकडे सुमारे 7000 असलं तरी तुमचं काम होईल. एवढ्या पैशात तुम्ही 2 ते 4 दिवस आरामात शिमला फिरू शकता.
हिमाचल प्रदेशमधील (Himachal Pradesh) प्रत्येक ठिकाण पर्यटनासाठी सर्वोत्तम आहेच. पण, त्यातच डलहौसी काहीसं खास आहे. डलहौसीचं सौंदर्य तुमच्या सुट्टीची मजा द्विगुणित करेल.
जर तुम्ही डलहौसीला जाण्यासाठी 3 दिवसांचा प्लॅन बनवत असाल तर तुमचा खर्च सुमारे 5 ते 6 हजार होऊ शकतो. येथे तुम्ही सच खिंड, गंजी पहारी, पंचपुला धबधबा, चामुंडा देवी मंदिर, बाकरोटा हिल्सला भेट देऊ शकता.
मग यंदाच्या सुट्ट्यांमध्ये कुठे जाण्याचा प्लॅन करताय?