Travel : मान्सूनमध्ये 'डेस्टिनेशन वेडिंग' प्लॅन करताय? 'या' ठिकाणांचं सौंदर्य पाहाल तर आश्चर्यचकित व्हाल
जुलै-ऑगस्ट हे भारतात पावसाचे महिने असतात. अशात, जर तुम्ही डेस्टिनेशन वेडिंगची योजना आखत असाल. परंतु ठिकाणाबाबत संभ्रमात असाल तर भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत, ज्यांचे सौंदर्य पावसाळ्यात अद्भूत होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appडेस्टिनेशन वेडिंगचा ट्रेंड गेल्या काही वर्षांत खूप लोकप्रिय होत आहे. पूर्वी हे सेलिब्रेटींपुरते मर्यादित असले तरी आता सर्वसामान्य लोकही त्याचे पालन करू लागले आहेत. मात्र, डेस्टिनेशन वेडिंगमध्ये अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते आणि जर तुमचं लग्न पावसाळ्यात होत असेल, तर त्याहून मोठी चिंता आहे.
जर तुम्ही डेस्टिनेशन वेडिंग प्लॅन करत असाल तर पावसाळ्यात या ठिकाणांच्या सौंदर्याची तुलना नाही. तुमच्या लग्नाचा क्षण खास बनवण्यासाठी तर भारतातील ही ठिकाणे सर्वोत्तम आहेत.
कोवलम - केरळची हिरवळ जगभरातील पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे, परंतु पावसाळ्यात येथील दृश्यं अधिक सुंदर होतात. हिरवाईशिवाय येथील समुद्रकिनारेही पाहण्यासारखे आहेत. केरळमधील बहुतेक ठिकाणे पाहण्यासारखी असली तरी कोवलम मात्र वेगळे आहे. येथे डेस्टिनेशन वेडिंग प्लॅन करणे प्रत्येकासाठी संस्मरणीय असेल. लग्न आणि त्याचे कार्य समुद्रकिनार्यावर किंवा हाऊसबोटमध्ये साजरे करणे ही सर्वात चांगली कल्पना असेल.
मग ते व्हेकेशन असो किंवा डेस्टिनेशन वेडिंग
खजुराहो - मध्य प्रदेशातील खजुराहो हे देखील पावसाळ्यात डेस्टिनेशन वेडिंगसाठी उत्तम ठिकाण आहे. पावसाळ्यात येथील हवामान अतिशय आल्हाददायक असते, ज्यामध्ये तुम्ही आरामात राहून लग्नाच्या प्रत्येक कार्यक्रमाचा आनंद घेऊ शकता. लग्नाचा क्षण खास बनवण्यासाठी मंदिरांपासून हॉटेल्सपर्यंत अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
उदयपूर - शाही विवाहसोहळ्यांसाठी उदयपूर हे लोकप्रिय ठिकाण आहे. इथे डेस्टिनेशन वेडिंग प्लॅन करणं खिशाला थोडं जड वाटत असलं, तरी प्रत्येक क्षणाचा आनंद तुम्हाला नक्कीच मिळेल याची खात्री आहे. उदयपूर हे बॉलीवूडपासून हॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत सर्वांचे आवडते ठिकाण आहे.