Travel Destination : दक्षिण भारतातील 'या' हिल स्टेशनला द्या पसंती, नवीन वर्षाचं जल्लोषात करा स्वागत
सर्वांनाच निसर्गरम्य ठिकाणी सुट्ट्या घालवायला आवडतं. त्यासाठी अनेक जण उत्तराखंडचा पर्याय निवडतात. पण दक्षिण भारतातही अनेक निसर्गरम्य ठिकाण आहेत, जिथे तुम्ही सुट्ट्यांचा आनंद घेऊ शकता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतुम्हीही जर नवीन वर्ष साजरं करण्यासाठी डेस्टिनेशन शोधत असाल, तर इथे तुम्हाला सुंदर ठिकाणांची माहिती मिळेल. त्यामुळे तुम्ही यंदा दक्षिण भारतात सुट्ट्यांचा आनंद घेऊ शकता.
आपण हिल स्टेशनवर सुट्टी घालवण्याचा विचारात असू तेव्हा आपल्याला कुल्लू मनाली, नैनीताल, शिमला अशी ठिकाण आठवतात. पण दक्षिण भारतातही अनेक निसर्गरम्य हिल स्टेशन आहेत.
तामिळनाडूमध्ये समुद्रतळापासून 3500 फूट उंचीवर वालपराई हिल स्टेशन अतिशय निसर्गरम्य आहे. वालपराईच्या जंगलात तुम्हाला निसर्गाचा आनंद घेत मजा करता येईल. पश्चिम घाटातील अन्नामलाई रांगेत वसलेले हे ठिकाण सर्वात प्राचीन ठिकाणांपैकी एक आहे.
तामिळनाडूमधील येलागिरी हिल स्टेशनही फार प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. याला निसर्ग सौंदर्याचा वारसा लाभला आहे. येलागिरी हिल स्टेशनवरील सुंदर दृश्याने तुम्हीही भारावून जाल.
तमिळनाडूच्या नमक्कल जिल्ह्यात असलेले कोल्ली हिल्स फार विलोभनीय पर्यटनस्थळ आहे. याला कोल्लीमलाई म्हणूनही ओळखलं जातं. येथील निसर्ग पाहून तुम्ही मंत्रमुग्ध व्हाल.
उटी जवळील कोटागिरी हेही अत्यंत सुंदर आणि निसर्गरम्य असं हिल स्टेशन आहे. येथे तुम्हांला शांतता मिळेल. शहरातील गजबजाटापासून दूर येथे तुम्ही निसर्गाच्या रंगात न्हाऊन निघू शकता.