Diet in Fever : ताप आल्यावर आहारात या घटकांचा समावेश करा ...
Diet in Fever : तापामुळे शरीरात पाण्याची कमतरता जाणवते. ही पूर्ण करण्यासाठी तुम्ही काही गोष्टींचे सेवन करू शकता.

Diet in Fever
1/10
तापामुळे शरीरात पाण्याची कमतरता जाणवते. हे पूर्ण करण्यासाठी तुम्ही काही गोष्टींचे सेवन करू शकता. यामुळे शरीराला पुरेशा प्रमाणात ऊर्जा मिळते आणि तापापासून लवकर आराम मिळतो. [Photo Credit : Pexel.Com]
2/10
ताप आल्यावर हे खावे : हिरव्या पालेभाज्यांचे सूप:जेव्हा तुम्हाला ताप येतो तेव्हा तुम्हाला काहीही खावेसे वाटत नाही, पण हिरव्या पालेभाज्यांचे सूप बनवून प्यायल्यास खूप फायदा होतो. [Photo Credit : Pexel.Com]
3/10
हिरव्या पालेभाज्यांमध्ये आहारातील फायबर चांगल्या प्रमाणात आढळते. त्यात भरपूर पौष्टिक घटक असतात. भाजीचे सूप विषाणूजन्य तापही बरा करू शकतो. [Photo Credit : Pixabay.Com]
4/10
फळे : ताप असताना फळे खाणे टाळावे असे काही लोकांचे मत आहे, परंतु आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे असे नाही. जेव्हा ताप येतो तेव्हा रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. [Photo Credit : Pexel.Com]
5/10
फळे खाल्ल्याने व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात मिळते, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि लवकर आराम मिळतो. [Photo Credit : Pexel.Com]
6/10
खिचडी:ताप आल्यास शक्य तितके पौष्टिक पदार्थ खावे . यामुळेच रुग्णांना खिचडी खाण्याचा सल्ला दिला जातो. खिचडी हा पूर्ण आहार मानला जातो. डाळींमधून प्रथिने आणि तांदळातून कार्बोहायड्रेट्स मिळतात. [Photo Credit : Pexel.Com]
7/10
खिचडीतून शरीराला पुरेशा प्रमाणात पाणीही मिळतं. खिचडीला चव चांगली नसेल तर त्यात कोथिंबीर आणि लिंबाचा रस घालू शकता. पुदिन्याची चटणी किंवा दह्यासोबतही याचा आस्वाद घेऊ शकता. [Photo Credit : Pexel.Com]
8/10
चिकन सूप: तापानंतर कमजोर झालेल्या शरीराला ताकद देण्यासाठी तुम्ही चिकन सूपही पिऊ शकता. चिकन सूपमध्ये प्रथिने, कार्बोहायड्रेट, खनिजे आणि जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात आढळतात. [Photo Credit : Pexel.Com]
9/10
नारळ पाणी: नारळाच्या पाण्याने शरीर हायड्रेट ठेवता येते. हे प्यायल्याने शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स वाढतात. नारळ पाणी आरोग्यासाठी फायदेशीर आहे. ताप आल्यास याचे सेवन करणे चांगले मानले जाते. [Photo Credit : Pexel.Com]
10/10
टीप:वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.[Photo Credit : Pexel.Com]
Published at : 23 Dec 2023 12:42 PM (IST)