Dating Tips : पहिल्यांदा डेटवर जात आहात? इम्प्रेस करण्याकरता 'या' गोष्टी ठेवा लक्षात , डेट होईल खास
डेटिंगसाठी असे कोणतेही नियम नाहीत. पण अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही नक्कीच लक्षात ठेवल्या पाहिजेत. तुमच्या या छोट्या गोष्टी समोरच्याला इम्प्रेस करतील. या गोष्टी जाणून घेऊया.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतुम्ही तुमच्या डेट करणाऱ्या व्यक्तीसोबत चांगले वर्तन ठेवावे हे सर्वात महत्त्वाचे आहे. एवढेच नाही तर डेट दरम्यान तुमच्या वागण्याने तुमच्या आजूबाजूच्या लोकांना इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करा.
बोलत असताना, त्यांच्याकडे पहा, स्मित करा आणि नजर त्यांच्याकडेच असू द्यात.
डेटवर लगेच तुमच्या उणिवा सांगू नका. खरं तर महिलांना आत्मविश्वासू पार्टनर आवडतात. त्याकरता आधी स्वत:वर प्रेम करा.
डेटवर गेल्यावर मुलांनी सुरूवातील बिल भरणे मुलींना आवडते. तर शक्यतो प्रयत्न करा की, तुम्हीच बिल भराल.
लोक सहसा पहिल्या डेटला खूप घाबरतात. अशा परिस्थितीत त्यांना या खास क्षणाचा आनंद घेता येत नाही. तुम्ही प्रत्येक क्षणाचा आनंद लुटत आहात याची जाणीव तुमच्या जोडीदाराला करून द्या.
प्रत्येकाच्या सवयी सारख्या नसतात, अनेकांच्या सवयी वेगळ्या असतात. डेट दरम्यान एकमेकांच्या उणीवा दाखविणे टाळा. एकमेकांमधील चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा.
पहिल्या डेटकरता जागा खूप महत्वाची असते. त्यामुळे तुमच्या दोघांना आवडेल अशी जागा निवडा. तुम्ही दोघे मिळून जागा निवडू शकता. ज्यामुळे तुम्हाला तिथे आरामदायी वाटेल. खूप गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा.
डेटवर समोरच्या व्यक्तीला जाणून घ्या. तिला/त्याला काय आवडते. छंद काय आहेत? हे समजून घ्या.
इम्प्रेस करण्याकरता वाढीव काही करू नका. पहिली डेट साधी आणि मजेदार असू द्यात.